E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे बँकिंग, वित्त आणि उद्योग क्षेत्रात क्रांती : डॉ. प्रणती टिळक
Samruddhi Dhayagude
11 Jun 2025
’टिमवि’मध्ये क्रिप्टोकरन्सी, ब्लॉकचेन आणि अकाउंटिंग विषयावरील पुस्तकांचे प्रकाशन
पुणे : ब्लॉकचेन एक महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान असून, ते समजून घेणे आजच्या डिजिटल युगात अत्यावश्यक बनले आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे बँकिंग, वित्त आणि उद्योग क्षेत्रात क्रांती घडून येत आहे, असे प्रतिपादन टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन विभागाच्या अधिष्ठाता डॉ. प्रणती टिळक यांनी केले.
टिमविच्या मुकुंदनगर संकुलातील सेमिनार हॉलमध्ये व्यवस्थापन विभागातील प्राध्यपिका डॉ. भाग्यश्री देशपांडे लिखित ‘वित्तीय बाजारपेठेत क्रिप्टोकरन्सी आणि ब्लॉकचेन’ आणि ‘भविष्यातील डिजिटल युगासह अकाउंटिंग’ या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. प्रणती टिळक बोलत होत्या. यावेळी देशपांडे क्लासेसचे प्रमुख प्रा. मुकुंद देशपांडे, लेखिका डॉ. भाग्यश्री देशपांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
डॉ. प्रणती टिळक म्हणाल्या, ब्लॉकचेन तंत्रज्ञान समजून घेणे आजच्या डिजिटल युगात अत्यावश्यक बनले आहे, संगणक व नेटवर्कच्या माध्यमातून होणारी डिजिटल फसवणूक, माहितीची चोरी यांसारख्या समस्यांवर उपाय म्हणून ब्लॉकचेनचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे.
प्रा. मुकुंद देशपांडे म्हणाले, भारतात एआय सारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर वित्त क्षेत्रात काही कंपन्या करीत आहेत. अजून सर्वत्र त्याचा वापर झाला नसला, तरी लवकरच संपूर्ण वित्त प्रणाली डिजिटल होईल. मानवी हस्तक्षेप कमी होईल आणि व्यवहारांमध्ये पारदर्शकता व विश्वासार्हता वाढेल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यामुळे भारत जगातील चौथी अर्थव्यवस्था असलेला देश आहे.
डॉ. भाग्यश्री देशपांडे म्हणाल्या, ‘क्रिप्टोकरन्सी अँड ब्लॉकचेन इन फायनान्शिअल मार्केट्स’ हे पुस्तक ब्लॉकचेन तंत्रज्ञानामागील मूलभूत संकल्पना, बिटकॉइन आणि इथेरियमसारख्या क्रिप्टोकरन्सीचा उदय आणि जागतिक वित्तपुरवठा पुर्नसंरचित करण्याच्या त्यांच्या क्षमतेचा अभ्यास मांडते. दुसरे पुस्तक ‘डिजिटल युगातील अकाउंटिंग’ या बदलांचा सखोल अभ्यास करते. आजच्या वेगाने बदलणार्या तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर, वित्त क्षेत्रात मोठे परिवर्तन होत आहे. हे दोन्ही पुस्तके डिजिटल युग समजून घेण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरतील. सुत्रसंचालन व्यवस्थापन विभागातील विद्यार्थी अनुज राठोड व माही ओंबाळे यांनी केले.
Related
Articles
संतांचे पालखी सोहळे पंढरपूर तालुक्यात
04 Jul 2025
जे जे रुग्णालयातील डॉक्टरची आत्महत्या
09 Jul 2025
खिडकीच्या गजाला लटकलेल्या लहान मुलीचे प्राण वाचवले
09 Jul 2025
‘धर्म निरपेक्षता’ शब्दही नको..?
06 Jul 2025
नोंदणी नसलेल्या प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण घेणार्या खेळाडूची पुरस्कारांसाठी शिफारस नाही : एएफआय
08 Jul 2025
ढगफुटीतील बळींची संख्या १३ वर; २९ जण बेपत्ता
04 Jul 2025
संतांचे पालखी सोहळे पंढरपूर तालुक्यात
04 Jul 2025
जे जे रुग्णालयातील डॉक्टरची आत्महत्या
09 Jul 2025
खिडकीच्या गजाला लटकलेल्या लहान मुलीचे प्राण वाचवले
09 Jul 2025
‘धर्म निरपेक्षता’ शब्दही नको..?
06 Jul 2025
नोंदणी नसलेल्या प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण घेणार्या खेळाडूची पुरस्कारांसाठी शिफारस नाही : एएफआय
08 Jul 2025
ढगफुटीतील बळींची संख्या १३ वर; २९ जण बेपत्ता
04 Jul 2025
संतांचे पालखी सोहळे पंढरपूर तालुक्यात
04 Jul 2025
जे जे रुग्णालयातील डॉक्टरची आत्महत्या
09 Jul 2025
खिडकीच्या गजाला लटकलेल्या लहान मुलीचे प्राण वाचवले
09 Jul 2025
‘धर्म निरपेक्षता’ शब्दही नको..?
06 Jul 2025
नोंदणी नसलेल्या प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण घेणार्या खेळाडूची पुरस्कारांसाठी शिफारस नाही : एएफआय
08 Jul 2025
ढगफुटीतील बळींची संख्या १३ वर; २९ जण बेपत्ता
04 Jul 2025
संतांचे पालखी सोहळे पंढरपूर तालुक्यात
04 Jul 2025
जे जे रुग्णालयातील डॉक्टरची आत्महत्या
09 Jul 2025
खिडकीच्या गजाला लटकलेल्या लहान मुलीचे प्राण वाचवले
09 Jul 2025
‘धर्म निरपेक्षता’ शब्दही नको..?
06 Jul 2025
नोंदणी नसलेल्या प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण घेणार्या खेळाडूची पुरस्कारांसाठी शिफारस नाही : एएफआय
08 Jul 2025
ढगफुटीतील बळींची संख्या १३ वर; २९ जण बेपत्ता
04 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
3
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
4
एक देश, एक भाषा सूत्राचे अपयश
5
यादी सुधारण्याची घाई (अग्रलेख)
6
सिद्धरामय्यांची खुर्ची टिकली (अग्रलेख)