ढगफुटीतील बळींची संख्या १३ वर; २९ जण बेपत्ता   

शिमला : हिमाचल प्रदेशाच्या मंडी येथील ढगफुटी आणि पुराने १३ जणांचा बळी घेतला असून २९ जण अद्याप बेपत्ता आहेत. बेपत्ता नागरिकांचा शोध घेतला जात आहे, असे अधिकार्‍यांनी गुरुवारी सांगितले.मंडी जिल्ह्यात मंगळवारी दहा ठिकाणी ढगफुटी झाली. तीन ठिकाणी अचानक पूर आला तर काही ठिकाणी दरडी कोसळल्या. 
 
काल सकाळी दोन मृतदेह हाती लागले.  गोहरमध्ये सात मृतदेह सापडले. तर, थुनाग येथे पाच आणि कारसोग उपविभागात एक मृतदेह हाती लागला आहे. या आपत्तींमध्ये १५० हून अधिक घरांचे नुकसान झाले. यासोबतच, १०४ गोठे वाहून गेले. त्याखेरीज, ३१ वाहने, १४ पूल आणि अनेक रस्त्यांचे नुकसान झाले, असेही अधिकार्‍यांनी सांगितले.या आपत्तींमध्ये १६२ पशुधन मृत्युमुखी पडले. मंडीत ३१६ पशुधनासह ३७० जणांना वाचवण्यात आले. तसेच, पाच मदत छावण्या उभारण्यात आल्या ओहत, असे अधिकार्‍यांनी सांगितले.
 

Related Articles