नोंदणी नसलेल्या प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण घेणार्‍या खेळाडूची पुरस्कारांसाठी शिफारस नाही : एएफआय   

नवी दिल्ली : भारतीय अ‍ॅथलेटिक्स फेडरेशन (एएफआय) अर्जुन आणि खेलरत्न पुरस्कारांसारख्या राष्ट्रीय सन्मानांसाठी नोंदणीकृत नसलेल्या प्रशिक्षकांकडून प्रशिक्षित करणार्‍या कोणत्याही खेळाडूची शिफारस केली जाणार नाही. या निर्णयामुळे खेळामध्ये वाढत्या डोपिंग प्रकरणांना तोंड देण्यास मदत होईल, असे एएफआयचे प्रवक्ते आदिल सुमारीवाला यांनी स्पष्ट केले.  
 
सुमारीवाला म्हणाले, ट्रॅक आणि फील्ड खेळाडूंकडून डोपिंगमध्ये प्रशिक्षकांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. अलिकडच्या काळात, एएफआयने कठोर चाचणी आणि जागरूकता मोहिमांव्यतिरिक्त स्वतःचे काही उपक्रम सुरू करून या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आहे. अलीकडेच, एएफआयने देशातील सर्व प्रशिक्षकांची नोंदणी अनिवार्य करण्यासाठी ३१ जुलैची अंतिम मुदत निश्चित केली आहे. निर्देशांचे पालन न करणार्‍यांना ’काळ्या यादीत’ टाकले जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. आम्हाला आशा आहे, की प्रशिक्षक स्वतःची नोंदणी करतील. त्यानंतर आम्ही त्यांची नावे जाहीर करू. जे नोंदणी करत नाहीत त्यांना काळ्या यादीत टाकले जाईल.

Related Articles