E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
राज्यभरात आठवडाभर अवकाळी पाऊस
Samruddhi Dhayagude
17 May 2025
पुणे, सातारा, अहिल्यानगरसाठी ऑरेंज अलर्ट
पुणे : राज्यात पुढील आठवडाभर मेघगर्जना वीजांचा कडकडाट आणि वादळी वार्यासह पाऊस पडणार आहे. हा पाऊस पुढील आठवडाभर कायम असणार आहे. आज (शनिवारी) पुणे, अहिल्यानगर, सातारा, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
नैऋत्य मौसमी वारे (मान्सून) पुढे सरकरण्यासाठी अनुकुल वातावरण आहे. अंदमान व निकोबार बेटे, समुद्र परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. पुढील आठवडाभरात मान्सून केरळ किनारपट्टीवर दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. मात्र, तत्पूर्वी राज्यातील कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पूर्व मौसमी पावसाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या २४ तासात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस झाला. यावेळी वार्यांचा ताशी वेग ४० ते ५० इतका होता. त्यामुळे काही भागात पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले.
पुढील २४ तासात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव यासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वार्यासह पाऊस पडेल. त्यानंतर पुढील दोन दिवस ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, धुळे, जळगाव, नंदूरबाबर हे जिल्हे वगळता सर्वत्र जोरदार तर काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
पुण्यात रिपरिप...
शहर आणि परिसरात मागील चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. शुक्रवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी शहर आणि उपनगरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यानंतर रात्रीपर्यंत शहरात पावसाची रिपरिप सुरू होती. पावसामुळे हवेत गारवा पसरला आहे. सायंकाळपर्यंत शहरातील शिवाजीनगर परिसरात सर्वाधिक २०, मिमी, पाषाण १६.७ मिमी, वडगावशेरी ७ मिमी, कोरेगावपार्क १.५ मिमी, मगरपट्टा ०.५ मिमी पावसाची नोंद झाली. शिवाजीनगर, कोरेगांव पार्क, हडपसर, कोथरूड, वारजे, एनडीए, औंध, पाषाण, सिंहगड रोड, कात्रज, स्वारगेट, वडगांवशेरी, विश्रांतवाडी, येरवडा परिसरात पाऊस रात्रीपर्यंत कायम होता.
Related
Articles
पंजाब-बंगळुरु अंतिम सामन्यासाठी भिडणार
29 May 2025
शिवसेनेचे पदाधिकारी नीलेश घारे यांना अटक
30 May 2025
मिझोराममध्ये दहा दिवसांत पावसाने घेतले पाच बळी
04 Jun 2025
संजय राऊत असताना उद्धव यांना शत्रूची गरजच नाही
04 Jun 2025
‘लिंगायत महिलांचा इतिहास पुढे यावा’
02 Jun 2025
मुंबई शहरात साडेचार हजार मुले शाळाबाह्य
03 Jun 2025
पंजाब-बंगळुरु अंतिम सामन्यासाठी भिडणार
29 May 2025
शिवसेनेचे पदाधिकारी नीलेश घारे यांना अटक
30 May 2025
मिझोराममध्ये दहा दिवसांत पावसाने घेतले पाच बळी
04 Jun 2025
संजय राऊत असताना उद्धव यांना शत्रूची गरजच नाही
04 Jun 2025
‘लिंगायत महिलांचा इतिहास पुढे यावा’
02 Jun 2025
मुंबई शहरात साडेचार हजार मुले शाळाबाह्य
03 Jun 2025
पंजाब-बंगळुरु अंतिम सामन्यासाठी भिडणार
29 May 2025
शिवसेनेचे पदाधिकारी नीलेश घारे यांना अटक
30 May 2025
मिझोराममध्ये दहा दिवसांत पावसाने घेतले पाच बळी
04 Jun 2025
संजय राऊत असताना उद्धव यांना शत्रूची गरजच नाही
04 Jun 2025
‘लिंगायत महिलांचा इतिहास पुढे यावा’
02 Jun 2025
मुंबई शहरात साडेचार हजार मुले शाळाबाह्य
03 Jun 2025
पंजाब-बंगळुरु अंतिम सामन्यासाठी भिडणार
29 May 2025
शिवसेनेचे पदाधिकारी नीलेश घारे यांना अटक
30 May 2025
मिझोराममध्ये दहा दिवसांत पावसाने घेतले पाच बळी
04 Jun 2025
संजय राऊत असताना उद्धव यांना शत्रूची गरजच नाही
04 Jun 2025
‘लिंगायत महिलांचा इतिहास पुढे यावा’
02 Jun 2025
मुंबई शहरात साडेचार हजार मुले शाळाबाह्य
03 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
4
चेरीचा हंगाम बहरला
5
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार
6
आठवडाभरापासून मान्सून स्थिर