E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
Wrutuja pandharpure
29 May 2025
पुणे
: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त फर्ग्युसन महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले. सावरकरांच्या क्रांतिकारी कार्याची साक्ष असलेली महाविद्यालयातील ऐतिहासिक खोली क्रमांक १७ नागरिकांसाठी बुधवारी खुली ठेवण्यात आली होती.
१९०२ ते १९०५ या कालावधीत विद्यार्थी असताना सावरकर यांचे वास्तव्य या खोलीत होते. या खोलीतूनच ‘अभिनव भारत’ सारख्या संघटनेची पायाभरणी, स्वदेशी चळवळीची सुरुवात, विदेशी वस्त्रांची होळी यांसारख्या क्रांतिकारी उपक्रमांची आखणी करण्यात आली होती.
तसेच इथेच त्यांनी ‘सिंहगडाचा पोवाडा’, ‘बाजीप्रभू देशपांडे’ यांसारखी राष्ट्रप्रेरक
काव्यरचना केली.
या खोलीत सावरकरांचा अर्धपुतळा, डी. लिट. पदवीचे गणवेश, वैयक्तिक वस्तू आणि दुर्मीळ छायाचित्रांचे संग्रह पाहायला मिळतो. ही खोली आजही अनेकांना देशभक्तीची प्रेरणा देणारे ठिकाण म्हणून ओळखली जाते. १९०५ मध्ये विदेशी वस्त्रांची होळी प्रकरणामुळे त्यावेळचे प्राचार्य रँग्लर परांजपे यांनी सावरकरांना वसतिगृहातून वगळले होते, त्यावर लोकमान्य टिळकांनी ’केसरी’मधून जोरदार निषेध केला होता.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीने या खोलीचे जतन केले असून दरवर्षी सावरकर यांच्या जयंती आणि पुण्यतिथीला ही खोली सर्वांसाठी खुली केली जाते. आजच्या कार्यक्रमात डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अशोक पलांडे, कार्यवाह डॉ. आनंद काटिकर, फर्ग्युसनचे प्राचार्य श्याम मुडे आणि उपप्राचार्य प्रा. स्वाती जोगळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सावरकरांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
Related
Articles
भारतीय महिलांच्या रिले संघाला रौप्यपदक
01 Jun 2025
हुंड्यासाठी विवाहितेला घरात डांबले
03 Jun 2025
पंजाबमध्ये आणखी एका हेराला अटक
03 Jun 2025
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भरधाव मिक्सरने उडवले; दोघांचा जागीच मृत्यू
02 Jun 2025
सीमावर्ती भागातील मॉक ड्रिल स्थगित
29 May 2025
नीट परीक्षा होणार एकाच सत्रात
31 May 2025
भारतीय महिलांच्या रिले संघाला रौप्यपदक
01 Jun 2025
हुंड्यासाठी विवाहितेला घरात डांबले
03 Jun 2025
पंजाबमध्ये आणखी एका हेराला अटक
03 Jun 2025
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भरधाव मिक्सरने उडवले; दोघांचा जागीच मृत्यू
02 Jun 2025
सीमावर्ती भागातील मॉक ड्रिल स्थगित
29 May 2025
नीट परीक्षा होणार एकाच सत्रात
31 May 2025
भारतीय महिलांच्या रिले संघाला रौप्यपदक
01 Jun 2025
हुंड्यासाठी विवाहितेला घरात डांबले
03 Jun 2025
पंजाबमध्ये आणखी एका हेराला अटक
03 Jun 2025
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भरधाव मिक्सरने उडवले; दोघांचा जागीच मृत्यू
02 Jun 2025
सीमावर्ती भागातील मॉक ड्रिल स्थगित
29 May 2025
नीट परीक्षा होणार एकाच सत्रात
31 May 2025
भारतीय महिलांच्या रिले संघाला रौप्यपदक
01 Jun 2025
हुंड्यासाठी विवाहितेला घरात डांबले
03 Jun 2025
पंजाबमध्ये आणखी एका हेराला अटक
03 Jun 2025
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भरधाव मिक्सरने उडवले; दोघांचा जागीच मृत्यू
02 Jun 2025
सीमावर्ती भागातील मॉक ड्रिल स्थगित
29 May 2025
नीट परीक्षा होणार एकाच सत्रात
31 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
आदित्य ठाकरे यांचा आरोप
4
राज्यात मान्सून स्थिरावला
5
अल्कराझ,रॅडुकानू यांचा विजय
6
भारत-बांगलादेश सीमेवर तणाव