E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
शिवसेनेचे पदाधिकारी नीलेश घारे यांना अटक
Wrutuja pandharpure
30 May 2025
पुणे
: शिवसेनेचे (शिंदे गट) पदाधिकारी असलेल्या नीलेश घारे यांच्या मोटारीवर झालेल्या गोळीबाराचा उलगडा वारजे पोलिसांनी केला असून याप्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस संरक्षण, तसेच शस्त्र परवाना मिळवण्यासाठी घारे यांनी मोटारीवर गोळीबाराचा बनाव रचल्याचे उघडकीस आल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा घारे यांना अटक करण्यात आली.
नीलेश घारे यांचे येथील वारजे भागातील गणपती माथा परिसरामध्ये जनसंपर्क कार्यालय आहे. त्याठिकाणी १९ मे रोजी रात्री बाराच्या सुमारास त्यांच्या मोटारीच्या काचेवर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला होता. त्या वेळी घारे कार्यालयात होते. याप्रकरणी, घारे यांनी वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे याप्रकरणी तपास करत होते. घारे यांच्या मोटारीवर झालेल्या गोळीबारात त्यांचे परिचित असलेले सचिन गोळे, शुभम खेमणार, अजय ऊर्फ बगली सकपाळ यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याबरोबर असलेला साथीदार संकेत मातले हा पसार झाला होता.
पोलिसांनी गोळे, खेमनार, सकपाळ यांना वारजे भागातून ताब्यात घेतल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली. चौकशीत नीलेश घारे यांनीच गोळीबार करायला लावल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. घारे यांच्या मोटारीवर झालेल्या गोळीबाराचा पोलिसांंकडून विविध शक्यता गृहीत धरून तपास करण्यात आला. घारे यांनी शस्त्र परवाना मिळवण्यासाठी अर्ज केला होता. तसेच, त्यांनी पोलीस संरक्षण मागितले होते. शस्त्र परवाना मिळवण्यासाठी गोळीबाराचा बनाव रचला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला. तपासात घारे यांनी गोळीबाराचा बनाव रचल्याचे उघड झाले होते. त्यानंतर घारे यांना बुधवारी रात्री अटक करण्यात आल्याचे, परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले.
घारेसह चौघांना शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
पिस्तुल परवाना व सुरक्ष रक्षक मिळावा, यासाठी स्वत:च्या मोटारीवर गोळीबार घडवून आणणार्या शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) युवासेनेचे जिल्हाप्रमुख नीलेश घारे याच्यासह चौघांना गुरूवारी न्यायालयाने शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
घारे रेकॉर्डवरील गुन्हेगार
घारे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरोधात वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. २००६, २०११ आणि २०२४ साली त्यावर महाराष्ट्र पोलिस कायदा, शस्त्र कयद्यासह विविध कलमांनुसार गुन्हे दाखल आहेत.
Related
Articles
कोथरूडमधील वेदभवन पुलावर भीषण अपघात
17 Jun 2025
शिक्षण संस्थांनी परिवर्तन घडवणारे ज्ञान देणे गरजेचे : डॉ. गीताली टिळक
14 Jun 2025
कांची शंकराचार्य यांची ’आर्ट ऑफ लिव्हिंग’ केंद्राला भेट
15 Jun 2025
शेअर बाजार गडगडला; सेन्सेक्स, निफ्टी एक टक्क्यांनी घसरले
13 Jun 2025
दोस्ताना संपला
15 Jun 2025
ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेत जोरदार निदर्शने
16 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक