E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार
Wrutuja pandharpure
29 May 2025
वृत्तवेध
पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर भारताने केलेल्या हल्ल्यात ‘मेड इन इंडिया’ ब्राह्मोस क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला. यासोबतच पाकिस्तानने भारतावर हल्ला केला, तेव्हा ‘मेड इन इंडिया’ आकाश इंटरसेप्टरने हे हल्ले उधळून लावले. यानंतर भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमध्ये वापरलेले ड्रोन इस्रायली तंत्रज्ञानावर आधारित ‘मेड इन इंडिया’ धाटणीचे होते. या सर्व बाबींवरून दिसून येते की भारताचे संरक्षण क्षेत्र संपूर्ण जगात आपला ठसा उमटवण्यास सज्ज आहे.
अलिकडेच संरक्षण मंत्रालयाने माहिती दिली आहे की गेल्या दहा वर्षांमध्ये भारताची संरक्षण निर्यात ३४ पटींनी वाढली असून आपण जगभरातील ८० देशांना शस्त्रे आणि संरक्षण उपकरणे पुरवत आहोत. त्यात संरक्षण उत्पादनात आधीच स्वयंपूर्ण असलेले अनेक देश समाविष्ट आहेत; परंतु त्यांना भारतीय संरक्षण क्षेत्रात उत्पादित शस्त्रे त्यांच्या स्वतःच्या देशांमध्ये उपलब्ध असलेल्या शस्त्रांपेक्षा खूपच चांगली वाटतात. आज भारत जगातील ८० देशांना शस्त्रास्त्रे आणि संरक्षण उपकरणे निर्यात करतो. २०२४-२५ या आर्थिक वर्षात भारताची संरक्षण निर्यात गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत ३४ टक्क्यांनी वाढून २३,६६२ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. ती २०२९ पर्यंत पन्नास हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य सरकारने समोर ठेवले आहे. २०२४-२५ मध्ये भारताची संरक्षण निर्यात २३,६६२ कोटी रुपये होती तर २०१३-१४ मध्ये फक्त ६८६ कोटी रुपये होती. २०२४-२५ मध्ये भारताच्या खासगी क्षेत्राने १५,२३३ कोटी रुपयांची शस्त्रे आणि संरक्षण उपकरणे तर सरकारी ‘डीपीएसयू’ने ८,३८९ कोटी रुपयांची शस्त्रे आणि संरक्षण उपकरणे निर्यात केली आहेत.
भारताच्या पिनाका रॉकेट लाँचरवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव झाला आहे. ‘डीआरडीओ’ने विकसित केलेल्या या लाँचरची मार्क-१ आवृत्ती ४० किलोमीटर आणि मार्क-२ आवृत्ती ६५ किलोमीटरची रेंज देते. यासोबतच हल्ल्याची अचूकता आणि ४२ सेकंदामध्ये १२ रॉकेट डागण्याची क्षमता यामुळे पिनाका रॉकेट लाँचरला प्राधान्य दिले जाते. ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त वेगाने प्रवास करते. ते एक मार्गदर्शित क्षेपणास्त्र आहे, जे आपले लक्ष्य शोधून ते नष्ट करते. अलिकडेच, भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय सैन्याने पाकिस्तानविरुद्ध या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राचा वापर केला असून पाकिस्तानसह जगाने त्याची अचूकता आणि विध्वंसक क्षमता पाहिली आहे. याशिवाय तेजस लढाऊ विमान, विविध प्रकारच्या तोफखाना तोफा, ज्यामध्ये के ९ वज्र, बॉट आणि डॉर्नियर २२८ विमानांचा समावेश आहे. त्यांना परदेशातून मागणी आहे.
Related
Articles
पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट
02 Jun 2025
विदर्भ, मराठवाड्यात पाऊस कायम
02 Jun 2025
पुणे विमानतळाला ’स्लॉट वाढीचा’ बूस्टर
01 Jun 2025
बंगळुरूत चेंगराचेंगरीत ११ ठार
05 Jun 2025
संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी विरोधक एकवटले
04 Jun 2025
बंगळुरू-काठमांडू विमानसेवा आजपासून
01 Jun 2025
पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट
02 Jun 2025
विदर्भ, मराठवाड्यात पाऊस कायम
02 Jun 2025
पुणे विमानतळाला ’स्लॉट वाढीचा’ बूस्टर
01 Jun 2025
बंगळुरूत चेंगराचेंगरीत ११ ठार
05 Jun 2025
संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी विरोधक एकवटले
04 Jun 2025
बंगळुरू-काठमांडू विमानसेवा आजपासून
01 Jun 2025
पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट
02 Jun 2025
विदर्भ, मराठवाड्यात पाऊस कायम
02 Jun 2025
पुणे विमानतळाला ’स्लॉट वाढीचा’ बूस्टर
01 Jun 2025
बंगळुरूत चेंगराचेंगरीत ११ ठार
05 Jun 2025
संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी विरोधक एकवटले
04 Jun 2025
बंगळुरू-काठमांडू विमानसेवा आजपासून
01 Jun 2025
पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट
02 Jun 2025
विदर्भ, मराठवाड्यात पाऊस कायम
02 Jun 2025
पुणे विमानतळाला ’स्लॉट वाढीचा’ बूस्टर
01 Jun 2025
बंगळुरूत चेंगराचेंगरीत ११ ठार
05 Jun 2025
संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी विरोधक एकवटले
04 Jun 2025
बंगळुरू-काठमांडू विमानसेवा आजपासून
01 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
3
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
4
ठाण्यात एटीएसचे छापे
5
नाट्यगृहात उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेने लावले पिंजरे
6
सिंधूदेश चळवळ नेमकी काय आहे?