E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
लॉजिस्टिक्स पार्क्सच्या माध्यमातून राज्यात ५ हजार कोटींची गुंतवणूक
Samruddhi Dhayagude
15 May 2025
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत ब्लॅकस्टोन समूहासोबत करार
मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक्स पार्क्स क्षेत्रात ५ हजार १२७ कोटींची थेट परकीय गुंतवणूक आणि २७,५१० रोजगाराच्या संधी निर्माण करणार्या सामंजस्य करारावर बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्या करण्यात आल्या. राज्य सरकार तसेच ब्लॅकस्टोन समूहाच्या एक्सएसआयओ लॉजिस्टिक्स पार्क्स आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स यांच्यात हा महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. यानुसार नाशिक जिल्ह्यातील सिन्नरसह पनवेल, भिवंडी, नागपूर, चाकण यांसारख्या ठिकाणी लॉजिस्टिक्स पार्क्स विकसित केले जाणार आहेत.
सामंजस्य करार राज्यातील प्रमुख औद्योगिक आणि मल्टिमोडल लॉजिस्टिक क्षेत्रांमध्ये आधुनिक लॉजिस्टिक्स आणि इंडस्ट्रियल पार्क्सच्या विकासासाठी होणार आहे. या करारानुसार महाराष्ट्रात १० हून अधिक आधुनिक औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स पार्क्स उभारले जाणार आहेत. यासाठी ७९४.२ एकर जमीन उपलब्ध करून देण्यात येणार असून यापैकी १ कोटी ८५ लाख चौरस फूट जमिनीवर बांधकाम करण्यात येईल.
ही परिवर्तनात्मक भागीदारी नागपूर, मुंबई, पुणे आणि इतर ठिकाणी जागतिक दर्जाचे, पर्यावरण, सामाजिक आणि शासकीय अनुकूल असे औद्योगिक तसेच लॉजिस्टिक्स हब्स तयार करण्याच्या दिशेने पाऊल टाकणारी आहे. भारतातील उत्पादन, वेअरहाउसिंग आणि पुरवठा साखळी उत्कृष्टतेसाठी एक सशक्त पायाभूत रचना निर्माण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
सह्याद्री अतिथीगृह येथे उद्योग सचिव डॉ.पी.अन्बलगन आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्सचे अध्यक्ष आर.के.नारायणन यांनी या करारावर स्वाक्षरी केली. यावेळी उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासू, उपसचिव लक्ष्मीकांत ढोके, ब्लॅकस्टोन डहायझर्स प्रा. लि.चे वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक तुहिन पारिख, ब्लॅकस्टोन डव्हायझर्सचे व्यवस्थापकीय संचालक आलोक जैन, एक्सएसआयओ लॉजिस्टिक्स पार्क्सचे व्यवस्थापकीय संचालक आशीष अग्रवाल उपस्थित होते.
Related
Articles
मदत केंद्रांकडे जाणार्या नागरिकांवर इस्रायलचे हल्ले सुरूच
05 Jun 2025
सत्तेत परतण्याची घाई (अग्रलेख)
30 May 2025
बॉम्ब निकामी करण्यासाठी कोलोनमध्ये २० हजार नागरिकांचे स्थलांतर
05 Jun 2025
यंदा पद्मनाभ स्वामी मंदिरात होणार ‘दगडूशेठ’ गणपती विराजमान
01 Jun 2025
शुभमन गिल इंग्लंडला रवाना
02 Jun 2025
सिसोदिया, जैन यांना समन्स
05 Jun 2025
मदत केंद्रांकडे जाणार्या नागरिकांवर इस्रायलचे हल्ले सुरूच
05 Jun 2025
सत्तेत परतण्याची घाई (अग्रलेख)
30 May 2025
बॉम्ब निकामी करण्यासाठी कोलोनमध्ये २० हजार नागरिकांचे स्थलांतर
05 Jun 2025
यंदा पद्मनाभ स्वामी मंदिरात होणार ‘दगडूशेठ’ गणपती विराजमान
01 Jun 2025
शुभमन गिल इंग्लंडला रवाना
02 Jun 2025
सिसोदिया, जैन यांना समन्स
05 Jun 2025
मदत केंद्रांकडे जाणार्या नागरिकांवर इस्रायलचे हल्ले सुरूच
05 Jun 2025
सत्तेत परतण्याची घाई (अग्रलेख)
30 May 2025
बॉम्ब निकामी करण्यासाठी कोलोनमध्ये २० हजार नागरिकांचे स्थलांतर
05 Jun 2025
यंदा पद्मनाभ स्वामी मंदिरात होणार ‘दगडूशेठ’ गणपती विराजमान
01 Jun 2025
शुभमन गिल इंग्लंडला रवाना
02 Jun 2025
सिसोदिया, जैन यांना समन्स
05 Jun 2025
मदत केंद्रांकडे जाणार्या नागरिकांवर इस्रायलचे हल्ले सुरूच
05 Jun 2025
सत्तेत परतण्याची घाई (अग्रलेख)
30 May 2025
बॉम्ब निकामी करण्यासाठी कोलोनमध्ये २० हजार नागरिकांचे स्थलांतर
05 Jun 2025
यंदा पद्मनाभ स्वामी मंदिरात होणार ‘दगडूशेठ’ गणपती विराजमान
01 Jun 2025
शुभमन गिल इंग्लंडला रवाना
02 Jun 2025
सिसोदिया, जैन यांना समन्स
05 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
वाचक लिहितात
5
पती आणि सासू येरवडा कारागृहात
6
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी