सिसोदिया, जैन यांना समन्स   

नवी दिल्ली : सरकारी शाळांमधील वर्गखोली बांधकामातील कथित गैरव्यवहार प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आम आदमी पक्षाचे नेते (आप) मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांना समन्स बजावले आहे. त्यानुसार, जैन यांना ६ जून रोजी आणि सिसोदिया यांना ९ जून रोजी चौकशीसाठी एसीबीसमोर हजर राहावे लागणार आहे.
 
दरम्यान, ‘आप’च्या नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी सत्ताधारी भाजपकडून एसीबीचीचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. तसेच, शालेय वर्गखोल्यांच्या बांधकामात कोणताही भ्रष्टाचार झाला नाही, असेही ‘आप’ने म्हटले आहे.भाजपचा हा सुनियोजित राजकीय डाव आहे. ते आप नेत्यांवर खोटे आणि बिनबुडाचे आरोप करत आहे. केंद्रीय संस्थांचा भाजपकडून गैरवापर केला जात आहे, असेही ‘आप’ने म्हटले आहे. ‘आप’च्या आरोपांवर भाजपकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
 
सरकारी शाळांमध्ये १२,००० हून अधिक वर्गखोल्या बांधण्यात आला आहे. यामध्ये २० हजार कोटींहून अधिक आर्थिक अनियमितता झाली संशय आहे. यासंदर्भात, ३० एप्रिल रोजी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यावरुन, एसीबीने सिसोदिया आणि जैन यांना समन्स बजावले आहे.दिल्लीत भाजप २६ वर्षांनंतर सत्तेत आला. तर, ‘आप’ला सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे. मागील १२ वर्षांपासून दिल्लीत ‘आप’ सत्तेत होता. २०१९ मध्ये भाजप नेते कपिल मिश्रा, हरीश खुराणा आणि नीलकांत बक्षी यांनी एसीबीकडे तक्रार दाखल केली होती.
 

Related Articles