E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
यंदा पद्मनाभ स्वामी मंदिरात होणार ‘दगडूशेठ’ गणपती विराजमान
Wrutuja pandharpure
01 Jun 2025
सजावटीचा शुभारंभ सोहळा उत्साहात
पुणे
: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे यंदाच्या गणेशोत्सवात श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. केरळ राज्याची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरम येथे भगवान विष्णूंना समर्पित असे एक हिंदू मंदिर म्हणजे पद्मनाभ स्वामी मंदिर. हे मंदिर श्री वैष्णव परंपरेत श्री विष्णूंचे पवित्र निवासस्थान मानले जाते. अत्यंत पवित्र असलेल्या या मंदिराची तेजस्वी प्रतिकृती यंदाच्या गणेशोत्सवात दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे साकारण्यात येणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी शनिवारी दिली.
सणस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथील ट्रस्टच्या सजावट विभागात सजावटीचा शुभारंभ सोहळा कलादिग्दर्शक विनायक रासकर आणि सरिता रासकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतीश रासने, सौरभ रायकर, राजाभाऊ चव्हाण उपस्थित होते.
गेली अनेक वर्षे विविध मंदिरांची उत्कृष्ट प्रतिकृती सजावटीतून साकारण्याकरीता ट्रस्ट प्रयत्नशील आहे. यंदा ज्या पद्मनाभ मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे, ते मंदिर केरळ शैली आणि द्रविड शैलीच्या वास्तुकलेचे गुंतागुंतीचे मिश्रण करून बांधले गेले आहे. पद्मनाभ स्वामी मंदिराच्या प्रतिकृतीत ५ थरांचा गोपुर असणार आहे. त्यामध्ये कृष्णलीला, रामायण, सप्तऋषी, घोडे, हत्ती, सिंह साकारण्यात येणार आहेत. तर, गाभार्यात विष्णू लक्ष्मी, शिवपार्वती, श्रीकृष्ण आणि नृसिंह यांच्या मूर्ती असतील. मुख्य मखराच्या वरच्या बाजूस अष्टकोनी भागामध्ये भगवान पद्मनाभ स्वामींची भव्य निद्रिस्त मूर्ती साकारण्यात येणार आहे. नानाविध वैशिष्टयांनी परिपूर्ण असलेल्या मंदिराची प्रतिकृती सुमारे १०० फूट इतकी असेल.
प्रतिकृतीचा आकार १२० फूट लांब, ९० फूट रंद आणि १०० फूट उंच असणार आहे. यामध्ये ३० भव्य खांब असून ५०० देवी-दैवता, ऋषीमुनी यांच्या मूर्ती असणार आहेत. गाभारा सुवर्ण रंगाने सजलेला असून संपूर्ण छताचा भाग अष्टकोनी स्वरूपात साकारण्यात येईल. मुख्य सभामंडपातील खांबांची रचना सुटसुटीत असून भाविकांना लांबून सहजतेने श्रीं चे दर्शन घेता येईल. कलादिग्दर्शक विनायक रासकर यांनी मंदिराचे काम, मंडपव्यवस्था काळे मांडववाले यांनी केली आहे.
Related
Articles
मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन
13 Jun 2025
सेट परीक्षा सुरळीत
16 Jun 2025
वैभव सूर्यवंशीच्या ९० चेंडूत ठोकल्या १९० धावा
13 Jun 2025
चीन रोखणार ब्रह्मपुत्रेचे पाणी?
11 Jun 2025
इंग्लंडच्या संघात एडी जॅकचा समावेश
12 Jun 2025
सायबर चोरट्यांकडून सात लाखांची फसवणूक
17 Jun 2025
मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन
13 Jun 2025
सेट परीक्षा सुरळीत
16 Jun 2025
वैभव सूर्यवंशीच्या ९० चेंडूत ठोकल्या १९० धावा
13 Jun 2025
चीन रोखणार ब्रह्मपुत्रेचे पाणी?
11 Jun 2025
इंग्लंडच्या संघात एडी जॅकचा समावेश
12 Jun 2025
सायबर चोरट्यांकडून सात लाखांची फसवणूक
17 Jun 2025
मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन
13 Jun 2025
सेट परीक्षा सुरळीत
16 Jun 2025
वैभव सूर्यवंशीच्या ९० चेंडूत ठोकल्या १९० धावा
13 Jun 2025
चीन रोखणार ब्रह्मपुत्रेचे पाणी?
11 Jun 2025
इंग्लंडच्या संघात एडी जॅकचा समावेश
12 Jun 2025
सायबर चोरट्यांकडून सात लाखांची फसवणूक
17 Jun 2025
मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन
13 Jun 2025
सेट परीक्षा सुरळीत
16 Jun 2025
वैभव सूर्यवंशीच्या ९० चेंडूत ठोकल्या १९० धावा
13 Jun 2025
चीन रोखणार ब्रह्मपुत्रेचे पाणी?
11 Jun 2025
इंग्लंडच्या संघात एडी जॅकचा समावेश
12 Jun 2025
सायबर चोरट्यांकडून सात लाखांची फसवणूक
17 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक