E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
शुभमन गिल इंग्लंडला रवाना
Samruddhi Dhayagude
02 Jun 2025
मुंबई : रोहित शर्माने निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे नेतृत्त्व शुभमन गिलकडे देण्यात आले आहे. रिषभ पंत उपकर्णधार असेल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वी भारत अ संघ इंग्लंडमध्ये दोन प्रथम श्रेणी क्रिकेटचे सामने खेळणार आहे. या संघाचं नेतृत्त्व मात्र शुभमन गिलकडे देण्यात आले नाही. आयपीएलच्या एलिमिनेटरमधून गुजरात टायटन्स बाहेर गेल्यानें शुभमन गिल लवकरच इंग्लंडमध्ये दाखल होईल. तिथे तो एका प्रथम श्रेणी सामन्यात खेळणार आहे. याचे नेतृत्त्व बीसीसीआयने अभिमन्यू ईश्वरनकडे दिले आहे. शुभमन गिल त्याच्या नेतृत्त्वात खेळेल.
भारतीय क्रिकेट संघाची कसोटी मालिका २० जूनपासून सुरु होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामने होणार आहेत. त्यापूर्वीच भारत अ संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. पहिली मॅच ३० मे पासून सुरु झाली आहे. यामध्ये भारत अ संघाने करुण नायरच्या २०४ धावांमुळे ५५७ धावा केल्या आहेत.
अभिमन्यू ईश्वरनकडे संघाचे नेतृत्त्व
शुभमन गिल आयपीएल प्लेऑफमुळे भारत अ विरुद्ध इंग्लंड लायन्स संघाविरुद्ध खेळू शकला नव्हता. गिल ६ जूनपासून सुरु होणारी दुसरा सामना खेळू शकतो. मात्र तो भारत अ संघाचा कॅप्टन नसेल. भारत अ संघाचे कर्णधारपद २९ वर्षांच्या अभिमन्यू ईश्वरनकडे देण्यात आले आहे. दुसर्या सामन्यामध्ये देखील तोच संघाचे नेतृत्त्व करेल, अशी शक्यता आहे. यामुळं शुभमन गिलला दुसर्या सराव सामन्यात इंग्लंड लायन्स विरुद्ध अभिमन्यू ईश्वरनच्या नेतृत्त्वात खेळावं लागेल.
शुभमन गिल सोबत साई सुदर्शन देखील दुसर्या मॅचसाठी भारत-अ संघात दाखल होईल. याशिवाय केएल राहुल यानं देखील दुसर्या सराव सामन्यात खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. बीसीसीआयनं त्याला देखील मंजुरी दिली आहे. भारत अ विरुद्ध इंग्लंड लायन्स या सामन्यात तो खेळताना दिसू शकतो.
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका २० जूनपासून सुरु होणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं कसोटीमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारताला इंग्लंडमध्ये यंग ब्रिगेडच्या जोरावर विजेतेपद मिळविणे आव्हानात्मक असेल.इंग्लंडला देखील भारताविरुद्ध कसोटी मालिकेत २०१८ नंतर विजेतेपद मिळालेले नाही.भारताला देखील न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर कमबॅक करायचे आहे.
पहिली कसोटी: २०-२४ जून (लीड्स)
दुसरी कसोटी: २-६ जुलै (बर्मिंघम)
तिसरी कसोटी: १०-१४ जुलै (लॉर्ड्स)
चौथी कसोटी: २३-२७ जुलै (मँचेस्टर)
पाचवी कसोटी: ३१ जुलै-४ ऑगस्ट (द ओवल)
Related
Articles
’फूटबोर्ड’वर उभे राहून प्रवास केल्यास होणार कारवाई
12 Jun 2025
देशातील भीषण विमान अपघात
13 Jun 2025
दोस्ताना संपला
15 Jun 2025
सई परांजपे यांना पु. ल. स्मृती सन्मान प्रदान
14 Jun 2025
स्मृती मानधनाच्या रत्नागिरी जेट्स संघाचा पराभव
12 Jun 2025
विमान अपघातानंतर विकृतीचा कळस!
13 Jun 2025
’फूटबोर्ड’वर उभे राहून प्रवास केल्यास होणार कारवाई
12 Jun 2025
देशातील भीषण विमान अपघात
13 Jun 2025
दोस्ताना संपला
15 Jun 2025
सई परांजपे यांना पु. ल. स्मृती सन्मान प्रदान
14 Jun 2025
स्मृती मानधनाच्या रत्नागिरी जेट्स संघाचा पराभव
12 Jun 2025
विमान अपघातानंतर विकृतीचा कळस!
13 Jun 2025
’फूटबोर्ड’वर उभे राहून प्रवास केल्यास होणार कारवाई
12 Jun 2025
देशातील भीषण विमान अपघात
13 Jun 2025
दोस्ताना संपला
15 Jun 2025
सई परांजपे यांना पु. ल. स्मृती सन्मान प्रदान
14 Jun 2025
स्मृती मानधनाच्या रत्नागिरी जेट्स संघाचा पराभव
12 Jun 2025
विमान अपघातानंतर विकृतीचा कळस!
13 Jun 2025
’फूटबोर्ड’वर उभे राहून प्रवास केल्यास होणार कारवाई
12 Jun 2025
देशातील भीषण विमान अपघात
13 Jun 2025
दोस्ताना संपला
15 Jun 2025
सई परांजपे यांना पु. ल. स्मृती सन्मान प्रदान
14 Jun 2025
स्मृती मानधनाच्या रत्नागिरी जेट्स संघाचा पराभव
12 Jun 2025
विमान अपघातानंतर विकृतीचा कळस!
13 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !