E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
एनडीएत नवा अध्याय
Wrutuja pandharpure
30 May 2025
महिलांची पहिली तुकडी पासआउट
पुणे
: डोळ्यात देशसेवेची स्वप्ने घेऊन राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (एनडीए) तीन वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांचा १४८ वा दीक्षांत सोहळा गुरूवारी मोठ्या दिमाखात पार पडला. देशांच्या विविध भागातून आलेल्या व खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या १७ मुलींना पदवी प्रदान करण्यात आली. लष्कर, नौदल आणि हवाई दलात थेट त्यांची अधिकारी पदावर नियुक्ती होणार आहे. आपल्या मुलींचे कौतुक पाहण्यासाठी देशाच्या कानाकोपर्यातून त्यांचे आई-वडील व नातेवाईक या सोहळ्यात सहभागी झाले होते.
एनडीएची स्थापना पुण्यातील खडकवासला भागात ८ जून १९४९ रोजी सुमारे ७५ वर्षापूर्वी झाली. एकाच ठिकाणी लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे अधिकारी तयार करता यावेत, हा उद्देश होता. मात्र, या एनडीएमध्ये २०२१ पर्यंत मुलींना प्रवेश नव्हता. तशी तरतूद देखील नव्हती.
सरकारने २०२२ मध्ये मुलींना येथे प्रवेश दिला. पहिल्या तुकडीतच देशभरातील १७ मुलींनी बाजी मारली. त्यांचे कौतुक कऱण्यासाठी राष्ट्रपती दौपदी मुर्मू सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. या मुली तीन वर्षांचे खडतर परिश्रम पूर्ण करीत देशाच्या सैन्यदलात अधिकारी पदावर रुज होण्यास सज्ज झाल्या आहेत.
मुलींची ऐतिहासिक कामगिरी
या पदवीप्रदान सोहळ्यासाठी दिनदयाल उपाध्याय, गोरखपर विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा. डॉ. पूनम टंडन यांची उपस्थिती होती. त्या भौतिकशास्त्राच्या संशोधक आहेत. त्या म्हणाल्या, आज ३०० पेक्षा जास्त उमेदवारांनी या ठिकाणी पदवी घेऊन सैन्यदलात प्रवेश केला आहे. या १७ मुलींनी अथक परिश्रम घेत सैन्यदलातील अधिकारी म्हणून रुजू होण्याचा मान मिळवला आहे, याचे मला कैतुक वाटते.
या मुलींनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. एनडीएतून अधिकारी म्हणून बाहेर पडणारी मुलीची ही पहिलीच तुकडी आहे. त्यांनी देशातील लाखो मुलींच्या मनात नवी आशा, उर्जा आणि जिज्ञासा निर्माण केली आहे. मी त्यांचे अभिनंदन करते, असेही त्या म्हणाल्या.
३३९ विद्यार्थांना पदवी प्रदान
एनडीएचा गुरूवारी १४८ वा पदवी प्रदान सोहळा दिमाखात पार पडला. यावेळी ३३९ उमेदवारंना पदवी प्रदान कऱण्यात आली. यामध्ये बीए., बीएस्सी आणि बि. टेक. या पदवीचा समावेश आहे. प्रथमच १७ मुलींना पदवीचा मान मिळविला.
चार जणांना रौप्य पदक
पदवी प्रदान झालेल्या सोहळ्यात चार उमेदवारांना रोप्यपदक बहाल करण्यात आले. मुलींमधील पहिल्या रौप्य पदाकाची मानकरी क्षीती दक्ष, लकी कुमार, प्रीन्सकुमार कुशवाह आणि उदयसिंग नेगी यांना कुलगुरु डॉ. पूनम टंडन यांच्या हस्ते पदवीसह रौप्यपदक आणि चषकाने गौरविण्यात आले.
Related
Articles
ज्येष्ठ पत्रकार रंगनाथ माळवे यांचे निधन
24 Jun 2025
हिंदी लादणार का?
21 Jun 2025
यंदाच्या वर्षीचे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
19 Jun 2025
मार्केट यार्डात कामगार असुरक्षित
25 Jun 2025
पुण्यात आज पालख्यांचे आगमन
20 Jun 2025
शुबमन-रिषभ यांची शतके
22 Jun 2025
ज्येष्ठ पत्रकार रंगनाथ माळवे यांचे निधन
24 Jun 2025
हिंदी लादणार का?
21 Jun 2025
यंदाच्या वर्षीचे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
19 Jun 2025
मार्केट यार्डात कामगार असुरक्षित
25 Jun 2025
पुण्यात आज पालख्यांचे आगमन
20 Jun 2025
शुबमन-रिषभ यांची शतके
22 Jun 2025
ज्येष्ठ पत्रकार रंगनाथ माळवे यांचे निधन
24 Jun 2025
हिंदी लादणार का?
21 Jun 2025
यंदाच्या वर्षीचे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
19 Jun 2025
मार्केट यार्डात कामगार असुरक्षित
25 Jun 2025
पुण्यात आज पालख्यांचे आगमन
20 Jun 2025
शुबमन-रिषभ यांची शतके
22 Jun 2025
ज्येष्ठ पत्रकार रंगनाथ माळवे यांचे निधन
24 Jun 2025
हिंदी लादणार का?
21 Jun 2025
यंदाच्या वर्षीचे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
19 Jun 2025
मार्केट यार्डात कामगार असुरक्षित
25 Jun 2025
पुण्यात आज पालख्यांचे आगमन
20 Jun 2025
शुबमन-रिषभ यांची शतके
22 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मराठी साहित्य विश्वाने अरण्यऋषी गमावला
2
ह्रिदयाचे कराटेमध्ये सुवर्णपदक
3
खरी शिवसेना कोणती ते शिंदे यांनी दाखवून दिले : शहा
4
अखिलेश यांची ग्वाही (अग्रलेख)
5
यंदाच्या वर्षीचे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
6
जेजुरी-मोरगाव मार्गावर अपघातात आठ ठार