E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
पती आणि सासू येरवडा कारागृहात
Wrutuja pandharpure
30 May 2025
मैत्रिणी व नातेवाईकांची चौकशी होणार
पुणे
: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा यांची गुरूवारी न्यायालयाने येरवडा कारागृहात रवानगी केली. वैष्णवी यांना सासरच्या मंडळीकडून झालेल्या त्रासाबाबत त्यांच्या मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्याकडे चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.
हुंड्यासाठी मानसिक, शारिरीक छळ करून वैष्णवी हगवणेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेला पती शशांक राजेंद्र हगवणे (वय २७), सासू लता राजेंद्र हगवणे (वय ५४) व नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे (वय ३१) यांना न्यायालयाने बुधवारी (दि.२८) गुरूवारपर्यंत (दि.२९) एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. तर सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे (वय ६३) व दीर सुशील राजेंद्र हगवणे (वय २७) यांना ३१ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
निलेशचा राजेंद्र आणि सुशिल याच्या मदतीने शोध घेण्यात येत आहे. तर लता, करिश्मा व सुशिल हगवणे यांच्या मोबाईलचा देखील शोध सुरू आहे. चव्हाण व सुशिल यांच्यामधील गुन्ह्याच्या अनुषंगाने झालेले चॅट, मेसेज हे पुराव्यासाठी जप्त करण्यात येत आहेत. त्यामुळे शशांक, लता आणि करिश्मा यांच्या पोलिस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तीवाद सरकारी वकील नितीन अडागळे यांनी केला. दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून घेत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांनी आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल विभूते या गुन्ह्याचा तपास करत आहे. आतापर्यंत केलेल्या तपासाची सविस्तर माहिती त्यांनी न्यायालयात दिली.
निलेश चव्हाणचा शोध सुरू..
वैष्णवी यांच्या मुलाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या कस्पटे कुटुंबियांना पिस्तुलाचा धाक दाखवत धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला आरोपी निलेश चव्हाण हा अद्यापही फरारी आहे. पोलिस त्याच्या मागावर असून तो अद्याप मिळून आलेला नाही.
Related
Articles
पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत प्लॉटिंगच्या जागांवर बेकायदा बांधकाम सुरू
04 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
08 Jun 2025
समृद्धी महामार्गाच्या कामात १५ हजार कोटींचा गैरव्यवहार
06 Jun 2025
पार्सलमध्ये अमली पदार्थ असल्याचे सांगून महिलेच्या नावे कर्ज काढून २० लाखांची फसवणूक
07 Jun 2025
दमास्कस स्टॉक एक्सचेंज सहा महिन्यानंतर पुन्हा सुरू
03 Jun 2025
आठवडाभरापासून मान्सून स्थिर

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
3
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
4
ठाण्यात एटीएसचे छापे
5
नाट्यगृहात उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेने लावले पिंजरे
6
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण