E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
बॉम्ब निकामी करण्यासाठी कोलोनमध्ये २० हजार नागरिकांचे स्थलांतर
Samruddhi Dhayagude
05 Jun 2025
कोलोन : दुसर्या महायुद्धातील बॉम्ब निकामी करण्यासाठी बुधवारी जर्मनीतील कोलोन शहराच्या मध्यभागातून २० हजार हून अधिक रहिवाशांचे स्थलांतर करण्यात आले. दुसरे महायुद्ध समाप्तीच्या ८० वर्षांनंतरही युद्धकाळातील हवाई हल्ल्यांदरम्यान टाकलेले न फुटलेले बॉम्ब जर्मनीमध्ये वारंवार आढळतात. त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी कधीकधी मोठ्या प्रमाणात स्थलांतर करावे लागते. बुधवारी कोलोन शहरातून करण्यात आलेले स्थलांतर १९४५ नंतरचे सर्वात मोठे स्थलांतर आहे.
सोमवारी कोलोनच्या ऐतिहासिक केंद्रापासून राईन नदीच्या पलीकडे रस्ते बांधकामाच्या कामादरम्यान दुसर्या महायुद्धातील तीन न फुटलेले अमेरिकन बॉम्ब आढळून आले. बॉम्बच्या १ हजार मीटर त्रिज्येतील क्षेत्रातून जवळपास २० हजार ५०० रहिवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. घरांबरोबरच, या परिसरात ५८ हॉटेल्स, नऊ शाळा, अनेक संग्रहालये आणि कार्यालयीन इमारती आणि रेल्वे स्टेशन रिकामी करण्यात आली आहेत. हे बॉम्ब निकामी करण्याची तयारी सध्या तज्ज्ञांकडून सुरू आहे. एका दिवसात बॉम्ब निकामी करण्याची योजना आहे. मात्र, शहरातील प्रत्येक व्यक्ती धोक्याच्या बाहेर आहे, याची खात्री करण्यासाठी अधिकार्यांना किती वेळ लागतो, यावर ते अवलंबून आहे.
दरम्यान, २०१९ मध्ये जर्मनीतील फ्रँकफर्ट शहरात दुसर्या महायुद्धाच्या काळातील एक बॉम्ब सापडला. या बॉम्बचे वजन जवळपास ५०० किलो होते. बॉम्ब सापडल्यानंतर संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला आणि बॉम्ब निकामी करण्यासाठी तज्ज्ञांच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. २०१८ मध्ये इटलीच्या बोशेरा शहरात नदीच्या स्वच्छतेदरम्यानही दुसर्या महायुद्धातील बॉम्ब सापडला होता. या बॉम्बचे वजन जवळपास २२५ किलो होते.
Related
Articles
पिंपरी पालिकेच्या तिजोरीत ३१२ कोटी जमा
12 Jun 2025
प्रणव घोलकर,नशा रेवसकर यांची विजेतेपदावर मोहोर
13 Jun 2025
महाराष्ट्रात पावसाचे आठ बळी
16 Jun 2025
भारताची लोकसंख्या १.४६ अब्जाजवळ
11 Jun 2025
वाहतुकीचे नियम मोडणार्यांविरोधात थेट तक्रार करता येणार
16 Jun 2025
व्हीव्हीएस लक्ष्मण लंडनमध्ये
16 Jun 2025
पिंपरी पालिकेच्या तिजोरीत ३१२ कोटी जमा
12 Jun 2025
प्रणव घोलकर,नशा रेवसकर यांची विजेतेपदावर मोहोर
13 Jun 2025
महाराष्ट्रात पावसाचे आठ बळी
16 Jun 2025
भारताची लोकसंख्या १.४६ अब्जाजवळ
11 Jun 2025
वाहतुकीचे नियम मोडणार्यांविरोधात थेट तक्रार करता येणार
16 Jun 2025
व्हीव्हीएस लक्ष्मण लंडनमध्ये
16 Jun 2025
पिंपरी पालिकेच्या तिजोरीत ३१२ कोटी जमा
12 Jun 2025
प्रणव घोलकर,नशा रेवसकर यांची विजेतेपदावर मोहोर
13 Jun 2025
महाराष्ट्रात पावसाचे आठ बळी
16 Jun 2025
भारताची लोकसंख्या १.४६ अब्जाजवळ
11 Jun 2025
वाहतुकीचे नियम मोडणार्यांविरोधात थेट तक्रार करता येणार
16 Jun 2025
व्हीव्हीएस लक्ष्मण लंडनमध्ये
16 Jun 2025
पिंपरी पालिकेच्या तिजोरीत ३१२ कोटी जमा
12 Jun 2025
प्रणव घोलकर,नशा रेवसकर यांची विजेतेपदावर मोहोर
13 Jun 2025
महाराष्ट्रात पावसाचे आठ बळी
16 Jun 2025
भारताची लोकसंख्या १.४६ अब्जाजवळ
11 Jun 2025
वाहतुकीचे नियम मोडणार्यांविरोधात थेट तक्रार करता येणार
16 Jun 2025
व्हीव्हीएस लक्ष्मण लंडनमध्ये
16 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक