E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
अत्याचार करणार्या प्रशिक्षकास सक्तमजुरी
Samruddhi Dhayagude
12 Jun 2025
पुणे : नेमबाजी प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत असलेल्या बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या प्रशिक्षकास न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी व सात हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश आर. एन. हिवसे यांनी हा आदेश दिला.
रुद्रगौडा चनवीरगौडा पाटील (वय २८, रा. साई चौक, पाषाण, मूळ रा. बेळगाव, कर्नाटक) असे शिक्षा झालेल्या आरोपी प्रशिक्षकाचे नाव आहे. सरकारी पक्षाचा युक्तिवाद, तसेच साक्ष, पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने ही शिक्षा दिली. दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा भोगावी लागेल, असे न्यायालयाने निकालपत्रात म्हटले आहे. पीडित मुलीची उन्हाळी सुटीत नेमबाजी शिकायची इच्छा होती. तिच्या आईने तिला बालेवाडीतील एका नेमबाजी प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी पाठविले होते. १४ ते २० मे २०१९ या कालावधीत क्रीडा व्यवस्थापक असलेल्या आरोपी रुद्रगौडा पाटील याने मुलीला चहा, नाश्ता, शीतपेय देण्याचा बहाण्याने तिच्याशी अश्लील कृत्य केले. त्यावेळी मुलीने त्याला प्रतिकार केला. मुलीने या घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. आईने नेमबाजी प्रशिक्षण केंद्रातील वरिष्ठांना या घटनेची माहिती दिली. वरिष्ठ अधिकार्यांनी पाटील याच्याविरुद्ध कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, कारवाई झालेली नाही.
आरोपी पाटीलविरुद्ध हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या खटल्यात सरकार पक्षाकडून वकील प्रेमकुमार अगरवाल, तसेच फिर्यादीकडून वकील पुष्कर पाटील आणि वकील मयूर धाटावकर यांनी बाजू मांडली. सरकार पक्षाकडून सहा साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली.पीडित मुलगी आणि नेमबाजी प्रशिक्षण संस्थेतील अधिकार्यांची साक्ष या खटल्यात महत्त्वाची ठरली. पीडित मुलीला बंदूक व्यवस्थित पकडता येत नव्हती. त्यामुळे प्रशिक्षक पाटील तिला ओरडले. पाटील ओरडल्याने त्यांच्याविरुद्ध खोटी तक्रार दिल्याचा आरोप बचाव पक्षाच्या वकिलांनी युक्तिवादात केला होता.
Related
Articles
मालवाहतूकदारांच्या आंदोलनाला पुण्यात प्रतिसाद
03 Jul 2025
डॉ. नवलगुंदकर यांना श्रद्धांजली
08 Jul 2025
महाराष्ट्र आमच्या पैशावर जगतोय
08 Jul 2025
पहलगामच्या दहशतवाद्यांना तातडीने शिक्षा द्या
03 Jul 2025
मैलापाणी शुद्धीकरण केंद्रातील पाणी तळजाईवरील झाडांसाठी
04 Jul 2025
इंडोनेशिया बोट दुर्घटनेतील बेपत्ता नागरिकांचा शोध सुरूच
05 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
3
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
4
भारतातील संपत्ती स्थलांतर मंदावले
5
उत्तराधिकार्याची निवड ट्रस्ट आणि तिबेटच्या परंपरेप्रमाणे
6
ओडिशात बेकायदा खाणीचा भाग कोसळून तीन ठार