पहलगामच्या दहशतवाद्यांना तातडीने शिक्षा द्या   

क्‍वाड परिषदेत एकमुखी मागणी 

वॉशिंग्टन : पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील दोषींना तातडीने शिक्षा द्यावी, अशी मागणी क्‍वाड परिषदेत एकमुखाने करण्यात आली. त्यासाठी संयुक्‍त राष्ट्राने त्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले.
 
वॉशिंग्टन येथे सुरू असलेल्या क्‍वाड परिषदेत अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया सहभागी झाले आहेत. चार देशांच्या परराष्ट्र मंत्री यांनी भेट घेतली. परिषदेची वार्षिक बैठक भारतात आयोजित करण्याबाबत चर्चा देखील झाली. परिषदेने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. तसेच दहशतवाद्यांंविरोधात कठोर कारवाई करण्याचा आग्रह धरला आहे. तसेच हल्ल्यात मृत्युुमुखी पडलेल्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्‍त केली.  यासंदर्भातील संयुक्‍त जाहीरनामा प्रकाशित केला आहे. त्यात पाकिस्तानचा किंवा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चार दिवसांच्या संघर्षाचा उल्‍लेख केलेला नाही. 

Related Articles