E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानास सीमाभिंत बांधण्याच्या कामाला गती
Samruddhi Dhayagude
11 Jun 2025
पिंपरी : नवी सांगवी येथील जलसंपदा विभागाचे मैदान हे पीडब्ल्यूडी मैदान म्हणून ओळखले जाते. हे मैदान जलसंपदा विभाग प्रशिक्षण केंद्र, जलसंपदा यांत्रिकी भवन, दापोडी व महापालिका यांच्या मालकीचे आहे. सद्य:स्थितीत या मैदानावर अनेक टवाळखोर, तळीरामांची बैठक, राडारोडा, झोपड्या, भाजीविक्रेते व हॉटेल व्यावसायिक, दुचाकी प्रशिक्षण असे अतिक्रमण झाले आहे. आता या मैदानाभोवती सीमाभिंत उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे येथील अतिक्रमणांचा विळखा सुटण्यास मदत होणार आहे.
जलसंपदा विभागाच्या वतीने कामगार वसाहत व जलसंपदा अधिकारी प्रशिक्षण केंद्र या दोन इमारती बांधण्यात आलेल्या आहेत. तर सांगवी पोलिस ठाण्यासाठी काही जागा देण्यात आलेली आहे. महापालिकेच्या जागेवर बॅडमिंटन हॉल, संत सावता माळी उद्यान व पाण्याच्या दोन टाक्या, गुरांचा जुना दवाखाना, समाज मंदिर आहे. तसेच उद्यान, शाळा, कचरा, सांडपाणी प्रकल्प, दशक्रिया घाटासाठी जागा आरक्षित आहे.
पीडब्ल्यूडी मैदान ही केवळ एक मोकळी नसून, परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांचे केंद्र आहे. महापालिकेच्या वतीने दरवर्षी महिला बचत गटांसाठी पवना थडी जत्रा याच मैदानावर भरते.विविध क्रीडा स्पर्धा भरविण्यासाठी पंचक्रोशीतील खेळाडू त्याचा उपयोग करतात. जलसंपदा विभागाला मैदानातून काही प्रमाणात उत्पन्न मिळते. जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळेगुरव, दापोडी, पिंपळेनिलखसह परिसरातील खेळाडू आणि नागरिक नियमितपणे क्रिकेट, व्हॉलिबॉल, फुटबॉल यांसारख्या खेळाच्या सरावासाठी मोफत वापर करतात.
मात्र, काही खेळाच्या संघटना मैदानावर सिमेंट काँक्रीट करत स्वतःचा हक्क सांगत असल्याचा धक्कादायक प्रकारही समोर येत आहे. त्यामुळे या जलसंपदा विभागाच्या पीडब्ल्यूडी मैदानास बांधली जाणारी भिंत ही मैदानासाठी व तेथून घडणार्या नवोदित खेळाडूंसाठी नव संजीवनी ठरेल.
जलसंपदा यांत्रिकी भवनाच्या अंतर्गत असलेल्या कामगार वसाहतीतील इमारतींमध्ये दोन इमारती वगळता सर्व इमारती बंद असून, त्या ठिकाणी अतिक्रमण करत राजरोसपणे काही नागरिक राहताना दिसून येत आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी अनुचित प्रकार घडण्याचीही शक्यता आहे. मैदानास सीमाभिंत बांधत असताना अतिक्रमण करणार्या व्यावसायिकांचा, झोपडीधारकांचा त्रास होत आहे. सीमाभिंत बांधून पूर्ण झाल्यानंतर या मैदानाचा योग्य कामासाठी अधिक वापर होईल. सीमाभिंतीचे बांधकाम जलसंपदा विभाग व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने संयुक्तपणे होत आहे. सद्य:स्थितीत या जागेत यांत्रिकी भवनाच्या दोन कामगार वसाहती सुरू असून भिंत बांधल्यानंतर मैदान व इतर विभागांनाही अधिक सुरक्षा लाभणार आहे.
Related
Articles
सराफाच्या दुकानावर दरोडा टाकणार्यांना अटक
04 Jul 2025
घरात घुसून तरूणीवर अत्याचार
04 Jul 2025
लॉर्डस्वर बुमराहचा सामना करण्यासाठी चांगली तयारी करावी लागेल : मॅक्युलम
08 Jul 2025
पृथ्वी शॉ महाराष्ट्राच्या संघात सामील
08 Jul 2025
जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरने अटल सेतूवरून मारली उडी
08 Jul 2025
माउलींच्या जयघोषात दुसरे गोल रिंगण उत्साहात
03 Jul 2025
सराफाच्या दुकानावर दरोडा टाकणार्यांना अटक
04 Jul 2025
घरात घुसून तरूणीवर अत्याचार
04 Jul 2025
लॉर्डस्वर बुमराहचा सामना करण्यासाठी चांगली तयारी करावी लागेल : मॅक्युलम
08 Jul 2025
पृथ्वी शॉ महाराष्ट्राच्या संघात सामील
08 Jul 2025
जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरने अटल सेतूवरून मारली उडी
08 Jul 2025
माउलींच्या जयघोषात दुसरे गोल रिंगण उत्साहात
03 Jul 2025
सराफाच्या दुकानावर दरोडा टाकणार्यांना अटक
04 Jul 2025
घरात घुसून तरूणीवर अत्याचार
04 Jul 2025
लॉर्डस्वर बुमराहचा सामना करण्यासाठी चांगली तयारी करावी लागेल : मॅक्युलम
08 Jul 2025
पृथ्वी शॉ महाराष्ट्राच्या संघात सामील
08 Jul 2025
जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरने अटल सेतूवरून मारली उडी
08 Jul 2025
माउलींच्या जयघोषात दुसरे गोल रिंगण उत्साहात
03 Jul 2025
सराफाच्या दुकानावर दरोडा टाकणार्यांना अटक
04 Jul 2025
घरात घुसून तरूणीवर अत्याचार
04 Jul 2025
लॉर्डस्वर बुमराहचा सामना करण्यासाठी चांगली तयारी करावी लागेल : मॅक्युलम
08 Jul 2025
पृथ्वी शॉ महाराष्ट्राच्या संघात सामील
08 Jul 2025
जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरने अटल सेतूवरून मारली उडी
08 Jul 2025
माउलींच्या जयघोषात दुसरे गोल रिंगण उत्साहात
03 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण
3
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
4
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
5
जीएसटी संकलनात घट
6
रशियाच्या कारखान्यावर युक्रेनकडून ड्रोन हल्ला