जे जे रुग्णालयातील डॉक्टरची आत्महत्या   

मुंबई : जे.जे. रुग्णालयातील वसतिगृहातील खोलीत वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्याने गळफास घेऊन रविवारी रात्री आत्महत्या केली. घरातील आर्थिक अडचणी व अभ्यासाच्या तणावातून त्याने हा प्रकार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. याप्रकरणी सर जे.जे. मार्ग पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.
 
रोहन रामफेर प्रजापती (वय- २२) असे तरुणाचे नाव आहे. तो सर जे.जे. मार्ग रुग्णालयाच्या आवारातील अपना बॉईज वसतिगृहातील खोली क्रमांक १९८ मध्ये राहायचा. वैद्यकीय पदवी एमबीबीएस तिसर्‍या वर्षांत तो शिक्षण घेत होता. त्याने राहत्या खोलीतील पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला. या प्रकरणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अंतर्गत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आली आहे. या प्रकरणी विद्यार्थ्यासोबत शिकणार्‍या व वसतिगृहात राहणार्‍या मुलांकडून घटनेची माहिती घेण्यात आल्याचे अधिकार्‍याने सांगितले. 

Related Articles