E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
विद्यार्थ्यांना घेऊन जाणार्या बसला मलेशियात अपघात; १५ ठार
Samruddhi Dhayagude
10 Jun 2025
पेराक : मलेशियातील पेराक येथे विद्यार्थ्यांना घेऊन विद्यापीठात जाणार्या बसची एका मोटारीला जोरदार धडक झाली. यामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी घडली. अपघातानंतर मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मोटारीला धडकल्यानंतर बसचे नियंत्रण सुटले.
पेराकमधील पूर्व-पश्चिम महामार्गावर एका विद्यापीठाच्या बसची मोटारीला धडक झाली. या बसमध्ये विद्यापीठातील विद्यार्थी बसले होते. पेराकचे पोलिस प्रमुख नूर हिस्याम नॉर्डिन म्हणाले, सुरुवातीच्या तपासात बसचे नियंत्रण सुटल्याचे दिसून आले आहे. त्याने आधी मागून येणार्या मोटारीला धडक दिली आणि रस्त्याच्या कडेला गेली.
उच्च शिक्षण मंत्रालयाने पुष्टी केली आहे, की गेरिकमधील बानून येथे झालेल्या अपघातात सुलतान इद्रिस एज्युकेशन विद्यापीठाचे १५ विद्यार्थी ठार झाले आहेत. हुलू पेराक सिव्हिल डिफेन्स फोर्सच्या म्हणण्यानुसार, बानून आपत्ती ऑपरेशन्स कंट्रोल सेंटरला दुपारी १ वाजून १० मिनिटांनी अपघाताबद्दल फोन करण्यात आला आहे. बसमध्ये ४८ जण असल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी पोहोचल्यावर असे आढळून आले की बस धडकल्यानंतर मोटार उलटली होती, असे नागरी संरक्षण दलाने एका निवेदनात म्हटले आहे.
ही बस तेरेन्गानू राज्यातील जेर्टेह येथून पेराकमधील तनजुंग मालीम येथील विद्यापीठाच्या मुख्य कॅम्पसकडे जात होती. या अपघातात १३ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला. या अपघातात अनेक विद्यार्थी जखमीही झाले आहेत. गंभीर जखमी झालेल्या दोन विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. इतर २० जणांचीही प्रकृती चांगली नाही. सहा विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.
Related
Articles
पाकिस्तानात ‘ब्रिगेड ३१३’ कशी?
12 Jun 2025
रस्त्यांवरील अडथळे उद्यापर्यंत दूर करा;अन्यथा १० कोटींचा दंड : उपमुख्यमंत्री पवार
15 Jun 2025
नाशिक शहर, पुणे ग्रामीण यांची मुलींमध्ये, तर उस्मानाबाद, परभणी यांची मुलांमध्ये उपउपांत्य फेरीत धडक
18 Jun 2025
जपानला भारताने मागे टाकण्यावर शिक्कामोर्तब
12 Jun 2025
पुणेरी बाप्पा संघाचा विजय
14 Jun 2025
ब्रिटनचे लढाऊ विमान केरळमध्ये उतरले
16 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !