ब्रिक्स हा संघर्षाचा गट नाही   

चीनची भूमिका 

बीजिंग : ब्रिक्स संघटना संघर्षाचा गट नाही. ती अमेरिकेसह कोणत्याही देशाच्या विरोधात कार्य करत नाही, अशी सारवासारव चीनने सोमवारी केली.अमेरिकेच्या विरोधात धोरण राबविणार्‍या देशांना अतिरिक्त दहा टक्के वाढीव आयात शुल्क लागू केले जाईल, अशी धमकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. त्या पार्श्वभूमीवर चीनने ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर भूमिका काल स्पष्ट केली. विकसनशील देशांसाठी प्रामुख्याने संघटना कार्यरत आहे.  उदयोन्मुख व्यापाराला सहकार्य करणार एका मंच आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी सांगितले. ब्रिक्स सर्वसमावेशक असून सहकार्य वाढविण्यावर भर देत आहे. ब्रिक्स संघर्ष करणारा गट नसून तो कोणत्याही देशाला लक्ष्य करत नाही. 

Related Articles