भारतीय संघाचा 336 धावांनी विजय   

बर्मिंगहॅम : दुसरी कसोटी जिंकण्यासाठी भारताने इंग्लंडला 608 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र रविवारी सामन्याच्या अखेरच्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी जोरदार प्रयत्न करून भारताला तब्बल 336 धावांनी बलाढ्य विजय मिळवून दिला.भारतीय गोलंदाजांपैकी आकाशदीप याने सर्वोत्तम कामगिरी करत 6 फलंदाज बाद केले. तर सिराज याने फलंदाज बाद केला. वॉशिंटन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1 बळी टिपला.  महमद सिराज याने जोश टंग याचा सर्वोत्तम झेल पकडला. आणि सामना भारताच्या बाजूने झुकला.  त्यानंतर आकाशदीपच्या गोलंदाजीवर शुभमन गिलने ब्रायडन कार्से याचा सर्वोत्तम झेल   पकडला. आणि सामन्यावर भारताने विजयी शिक्का नोंदविला. 
 
बर्मिंगहॅमच्या मैदानावर भारताला 1967 या वर्षांनंतर पहिल्यांदा विजय मिळाला. याआधी इंग्लंडचा संघ या मैदानावर कसोटी जिंकत आला होता. कपिल देव कर्णधार असताना मात्र भारताने एक सामना बरोबरीत सोडविला होता. त्याआधी भारताकडून शुभमन गिलने 161 धावा केल्या. त्याने पहिल्या डावात 269 धावा केल्या, यासह तो कसोटीत 400 पेक्षा जास्त धावा करणारा पहिला भारतीय ठरला. भारताने कसोटीच्या दोन्ही डावात 1014 धावा केल्या. कसोटी इतिहासात पहिल्यांदाच भारताने एका सामन्यात हजार धावांचा टप्पा ओलांडला. ऋषभ पंतने चालू मालिकेत 300 धावा पूर्ण केल्या. त्याने डएछA देशांच्या कसोटी मालिकेत तिसर्‍यांदा 300 पेक्षा जास्त धावा पूर्ण केल्या. असा पराक्रम करणारा तो आशियातील एकमेव विकेटकीपर फलंदाज आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील फक्त 2 कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी 7 शतके झळकावली आहेत. भारताबाहेरील मालिकेत पहिल्यांदाच टीम इंडियाने एकाच मालिकेत इतके शतके झळकावली आहेत.
 
शुभमन गिलने पहिल्या डावात 269 धावा केल्यानंतर दुसर्‍या डावात 161 धावा केल्या. त्याने एका कसोटीत 430 धावा केल्या. भारतीय कर्णधाराने कसोटीत सर्वाधिक धावा केल्या. 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात 293 धावा करणारा विराट कोहलीचा विक्रम गिलने मोडला शुभमन गिल कसोटीत सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू देखील ठरला. त्याने 1971 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 344 धावा करणार्‍या सुनील गावसकर यांचा विक्रम मोडला. त्यानंतर गावस्कर यांनी पहिल्या डावात शतक आणि दुसर्‍या डावात द्विशतक झळकावले होते. गिल एका डावात शतक आणि दुसर्‍या डावात द्विशतक झळकावणारा फक्त दुसरा भारतीय खेळाडू ठरला.
 
एका कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम इंग्लंडच्या ग्राहम गूचच्या नावावर आहे. त्याने 1990 मध्ये भारताविरुद्ध 456 धावा केल्या. शुभमन कसोटीत 400 पेक्षा जास्त धावा करणारा जगातील फक्त पाचवा खेळाडू ठरला. शुभमन गिलने पहिल्या डावात 3 आणि दुसर्‍या डावात 8 षटकार मारले. त्याने 11 षटकार मारून आपली फलंदाजी संपवली. यासह तो इंग्लंडमध्ये एका कसोटीत सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू बनला. त्याने इंग्लंडच्या अँड्र्यू फ्लिटाँफ, बेन स्टोक्स आणि भारताच्या ऋषभ पंत यांना मागे टाकले. तिघांचाही प्रत्येकी 9 षटकार मारण्याचा विक्रम होता.ऋषभ पंतने दुसर्‍या डावात 3 षटकार मारले. यासह, त्याच्या नावावर इंग्लंडमध्ये 24 षटकार आहेत. तो घरच्या मैदानाबाहेरील देशात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू बनला. पंतने दक्षिण आफ्रिकेत 21 षटकार मारण्याचा विक्रम असलेल्या बेन स्टोक्सला मागे टाकले.
 
संक्षिप्त धावफलक 
 
भारत (दुसरा डाव) : गिल 161, राहुल 55, जैस्वाल 28, करूण नायर 26, पंत 65, जडेजा 69, नितीश रेड्डी 1, वॉशिंटन सुंदर 12 एकूण 83 षटकांत 427/6
इंग्लंड(दुसरा डाव) : क्रावली 0, डकेट 25, ओली पोप 24, जेमी स्मिथ 88, स्टोक्स 33, ब्रायडन कार्से 38 एकूण 68.1 षटकांत 271/10

Related Articles