E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
सर्व शासकीय कार्यालयात होणार सौर ऊर्जेचा वापर
Wrutuja pandharpure
09 Jun 2025
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाऊर्जा नवीन प्रशासकीय इमारतीचे उदघाटन
पुणे : राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात डिसेंबर २०२५ पर्यंत सौर ऊर्जेचा वापर सुरू करणार असून प्रधानमंत्री सूर्य घर योजना राज्यात प्रभावीपणे राबविणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले.
महाऊर्जाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोर्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, खासदार मेधा कुलकर्णी, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, आमदार भीमराव तापकीर, महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, महाऊर्जाच्या महासंचालक डॉ.कादंबरी बलकवडे, महाराष्ट्र राज्य वीज कंपनीचे संचालक विश्वास पाठक, ऊर्जा दक्षता ब्युरोचे सचिव मिलिंद देवरे, अतिरिक्त महासंचालक डॉ. त्रिगुण कुलकर्णी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाऊर्जासाठी येत्या काळात दोन उद्दीष्टे महत्वाची आहेत. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौर ऊर्जेचा वापर करण्याला गती द्यावी लागेल. प्रधानमंत्री सुर्यघर योजना यशस्वी योजना असून त्या योजनेशी संलग्न असलेली राज्याची योजना सुरू करून पहिल्या टप्प्यात १०० युनिटपर्यंतचे सर्व ग्राहक आणि दुसर्या टप्प्यात ३०० युनिटपर्यंतचे सर्व ग्राहक सौर ऊर्जेवर आणायचे आहेत. ३०० युनिटपर्यंत वीजेचा वापर करणार्या ग्राहकांचे वीजचे देयक शून्यावर यावे असा प्रयत्न आहे. ही दोन्ही उद्दीष्टे पूर्ण करण्यासंदर्भात महाऊर्जा हे काम चांगल्यारितीने करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते महाऊर्जाच्या प्रगती अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमापूर्वी फडणवीस यांनी अन्य मान्यवरांसह अपारंपरिक उर्जेसंदर्भातील प्रदर्शनाला भेट दिली. सुरवातीला त्यांच्या हस्ते महाऊर्जा कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
सौर ऊर्जेच्या वापरामुळे वीजेचे दर कमी होणार
महाऊर्जाने गेल्या काही वर्षात अपारंपरिक ऊर्जा निर्माण करण्यात चांगली कामगिरी केली आहे. सौर ऊर्जेच्या निर्मितीत देशात आपण अग्रेसर आहोत. विभाजीत पद्धतीने सौर ऊर्जेवर वीज निर्माण करूनही देशात आपण महत्वाचे स्थान मिळविले आहे. कुसुम योजनेच्या अंमल बजावणीतही आपण पुढे आहोत. २०२६ च्या डिसेंबरपर्यंत कृषीची संपूर्ण वीजेची मागणी सौर ऊर्जेवर परिवर्तित करू शकू. गेल्या २० वर्षात दरवर्षी वीजेचे दर ९ टक्क्याने वाढवत आहोत. २०२५ ते २०३० मध्ये दरवर्षी वीजेचे दर आपण कमी करणार आहेत असे फडणवीस म्हणाले.
२०३० पर्यंत ५२ टक्के वीज निर्माण करणार
सौर ऊर्जा निर्मितीसाठी येणार्या समस्या दूर करण्याला प्राधान्य देत असल्याने वेगाने काम होत आहे. नुकताच रशियाच्या शासकीय कंपनीसोबत थोरियमपासून ऊर्जा निर्मितीत करार करण्यात आला असून हा करार भारतासाठी ऊर्जा क्षेत्राचे चित्र बदलणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कामांमुळे पर्यावरणाचा विनाश थांबविता येईल आणि २०३० पर्यंत ५० टक्के वीज अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातून निर्माण करण्याचे स्वप्नही पूर्ण होईल. २०३० पर्यंत राज्यात ५२ टक्के वीज अपारंपरिक स्रोतातून निर्माण होईल, असेही फडणवीस म्हणाले.
Related
Articles
छोट्या शेतकर्यांसाठी ७५ अब्ज डॉलर्सची गरज
07 Jul 2025
जरा हौले हौले चल्लो मोरे साजना...
07 Jul 2025
वाहतूक पोलिसांच्या नावाने फसवणुकीचा सपाटा
07 Jul 2025
सलग दुसर्या दिवशी शेअर बाजारात घसरण
04 Jul 2025
अकरावीच्या पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी आज शेवटची संधी
07 Jul 2025
इस्रो, नासासाठी पहिली चाचणी परीक्षा पूर्ण
08 Jul 2025
छोट्या शेतकर्यांसाठी ७५ अब्ज डॉलर्सची गरज
07 Jul 2025
जरा हौले हौले चल्लो मोरे साजना...
07 Jul 2025
वाहतूक पोलिसांच्या नावाने फसवणुकीचा सपाटा
07 Jul 2025
सलग दुसर्या दिवशी शेअर बाजारात घसरण
04 Jul 2025
अकरावीच्या पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी आज शेवटची संधी
07 Jul 2025
इस्रो, नासासाठी पहिली चाचणी परीक्षा पूर्ण
08 Jul 2025
छोट्या शेतकर्यांसाठी ७५ अब्ज डॉलर्सची गरज
07 Jul 2025
जरा हौले हौले चल्लो मोरे साजना...
07 Jul 2025
वाहतूक पोलिसांच्या नावाने फसवणुकीचा सपाटा
07 Jul 2025
सलग दुसर्या दिवशी शेअर बाजारात घसरण
04 Jul 2025
अकरावीच्या पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी आज शेवटची संधी
07 Jul 2025
इस्रो, नासासाठी पहिली चाचणी परीक्षा पूर्ण
08 Jul 2025
छोट्या शेतकर्यांसाठी ७५ अब्ज डॉलर्सची गरज
07 Jul 2025
जरा हौले हौले चल्लो मोरे साजना...
07 Jul 2025
वाहतूक पोलिसांच्या नावाने फसवणुकीचा सपाटा
07 Jul 2025
सलग दुसर्या दिवशी शेअर बाजारात घसरण
04 Jul 2025
अकरावीच्या पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी आज शेवटची संधी
07 Jul 2025
इस्रो, नासासाठी पहिली चाचणी परीक्षा पूर्ण
08 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण
3
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
4
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
5
रशियाच्या कारखान्यावर युक्रेनकडून ड्रोन हल्ला
6
जीएसटी संकलनात घट