छोट्या शेतकर्‍यांसाठी ७५ अब्ज डॉलर्सची गरज   

आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीच्या अध्यक्षांचे आवाहन 

नवी दिल्ली : जागतिक वातावरणातील बदलाच्या संकटातून भारतासह जगभरातील छोट्या शेतकर्‍यांना बाहेर काढण्यासाठी ७५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करावी लागेल, असे आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीचे अध्यक्ष अल्वारो लारिओ यांनी रविवारी सांगितले. वातावरणातील बदलाचा फटका भारतासह विविध देशांना आणि छेट्या शेतकर्‍यांना बसणार आहे, अशी चिंता व्यक्त करताना ते म्हणाले, तीन मोठे प्रश्न आहेत. त्यात शेती कशी करावी, उत्पादन कसे वाढवावे आणि अन्न सुरक्षेनंतर पोषक धान्यांची सुरक्षा कशी वाढवावी? यांचा समावेश आहे. 

Related Articles