सलग दुसर्‍या दिवशी शेअर बाजारात घसरण   

मुंबई : भारतीय शेअर बाजार गुरुवारी सलग दुसर्‍या दिवशी घसरणीसह बंद झाले. गुरुवारी शेअर बाजारात वाढीसह सुरुवात झाली होती. पण, बंद होईपर्यंत ही वाढ कायम राखण्यास अपयश आले. एका बाजूला फार्मा, ऑटो, तेल आणि वायू कंपन्यांचे शेअर्स वधारले, तर दुसरीकडे धातू, रिअल इस्टेट आणि बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांना फटका बसला आहे. 
 
कोटक महिंद्रा बँक आणि बजाज फायनान्ससारख्या मोठ्या बँकिंग कंपन्यांच्या शेअर्समधील घसरणीमुळे बाजारावर दबाव आला. दिवसभरच्या व्यवहारानंतर, सेन्सेक्स १७० अंकांनी घसरून ८३ हजार २३९ वर बंद झाला. निफ्टी ४८ अंकांनी घसरून २५ हजार ४०६ वर बंद झाला. निफ्टी बँक देखील २०७ अंकांनी घसरून ५६ हजार ७९२ वर बंद झाला. मिडकॅप कंपन्यांच्या निर्देशांकात मात्र, किरकोळ १६ अंकांची वाढ दिसली आणि तो ५९ हजार ६८३ वर बंद झाला.

या शेअर्समध्ये झाली घट?

२ टक्के इक्विटीच्या मोठ्या व्यवहारामुळे नायका ४ टक्कने घसरला.
पीएनबी ३ टक्क्यांनी घसरला, तर इंडियन बँक देखील उच्च स्तरावरून खाली आली.
एसबीआय लाईफसारख्या विमा कंपन्यांच्या शेअर्सवर दबाव दिसून आला.
महागड्या कच्च्या तेलामुळे इंडिगो या विमान कंपनीचा शेअर सुमारे ३ टक्क्यांनी घसरले.
वेदांताच्या डिमर्जर प्रक्रियेतील विलंबामुळे शेअर २ टक्क्यांनी घसरला.
 

Related Articles