E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
वाहतूक पोलिसांच्या नावाने फसवणुकीचा सपाटा
Wrutuja pandharpure
07 Jul 2025
आठ दिवसांत १५ तक्रारी
पिंपरी
: वाहतूक पोलिसांच्या नावाने मोबाईलवर बनावट चालान पाठवून नागरिकांची फसवणूक करण्याच्या प्रकारांनी जोर धरला आहे. सायबर चोरट्यांनी 'RTO Traffic Challan.apk’ नावाची एक फाईल व्हॉट्सअप आणि इतर सोशल मीडियावरून नागरिकांना पाठवण्याचा सपाटा लावला आहे. ही फाईल डाऊनलोड केल्यानंतर मोबाईलमध्ये मालवेअर (व्हायरस) घुसतो आणि त्याचे नियंत्रण थेट सायबर गुन्हेगारांच्या ताब्यात जाते. यामुळे मोबाईलमधील वैयक्तिक आणि बँकिंग माहिती चोरली जाऊन आर्थिक नुकसान होत आहे. पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांकडे अशा प्रकारच्या तब्बल १५ तक्रारी आठ दिवसांत दाखल झाल्या असून, पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सायबर गुन्हेगारांकडून पाठवलेली फॉरमॅटमधील ही बनावट फाईल मोबाईलमध्ये डाऊनलोड होताच, मोबाईलच्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये व्हायरस सक्रिय होतो. यानंतर मोबाईलचा पूर्ण अॅक्सेस गुन्हेगारांच्या हातात जातो. त्यामुळे ओटीपी, बँकिंग अॅप्स, यूपीआय व्यवहार, ई-मेल आयडी, संदेश, कॉल लॉग अशा गोपनीय माहितीवर त्यांना नियंत्रण मिळते. या माहितीचा वापर करून ते मोबाईलमधून थेट बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करतात, नवीन सिमकार्डसाठी विनंती करतात, मोबाईलमधील माहिती बदलतात किंवा काहीवेळा मोबाईल लॉक करून पैसेही मागतात.
तुमच्या वाहनावर दंड आहे, तुमच्यावर कोर्ट नोटीस आहे, तुमचा परवाना निलंबित होणार आहे, अशा आशयाचे मॅसेज पाठवून फाईल अथवा लिंक उघडण्यास भाग पाडले जाते. नागरिक घाबरून ती फाईल उघडतात आणि त्यातून फसवणुकीची सुरुवात होते. या प्रकारात बनावट वेबसाइट्सचा वापर केल्याचेही समोर आले आहे. यामध्ये 'mahatrafficechallan.in', 'punetrafficpay.com अशा नावाच्या खोट्या संकेतस्थळांचा समावेश आहे. या लिंक्स अधिकृत वेबसाइटसारख्या दिसतात. त्यामुळे नागरिक गोंधळून त्या लिंकवर क्लिक करतात. त्यामध्ये वाहन क्रमांक टाकायला सांगितले जाते आणि माहिती भरताच मोबाईलमध्ये व्हायरस इन्स्टॉल होतो.
खरे चलान इथेच तपासा..
वाहन चालानाबाबतची अधिकृत माहिती फक्त 'mahatrafficechallan.in', 'punetrafficpay.com या संकेतस्थळावरूनच मिळते. या वेबसाइटचा शेवट 'gov.in' असा असतो. याशिवाय'com', 'org', 'in' अशा शेवट असलेल्या कोणत्याही वेबसाइट्सवरून चलन पाठवले जात असेल, तर त्या लिंक्स बनावट असण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे अशी कोणतीही लिंक किंवा फाईल आल्यास ती न उघडता तात्काळ डिलीट करून सायबर पोलिसांकडे तक्रार द्यावी. मदतीसाठी १९३० या टोल फ्री क्रमांकावर सायबर हेल्पलाइनशी संपर्क साधावा.
Related
Articles
मेटा आणि गुगलला‘ईडी’चे समन्स
20 Jul 2025
इस्रायलने गाझातील युद्ध तातडीने थांबवावे
23 Jul 2025
पत्त्यांचा डाव टाकून कृषिमंत्र्यांचा निषेध
24 Jul 2025
जनसुरक्षा विधेयकावर स्वाक्षरी करू नका
19 Jul 2025
सरकारने विधानसभेला पत्त्याचा क्लब बनवला
24 Jul 2025
आपल्याच बलस्थानाचा घात करु नका
20 Jul 2025
मेटा आणि गुगलला‘ईडी’चे समन्स
20 Jul 2025
इस्रायलने गाझातील युद्ध तातडीने थांबवावे
23 Jul 2025
पत्त्यांचा डाव टाकून कृषिमंत्र्यांचा निषेध
24 Jul 2025
जनसुरक्षा विधेयकावर स्वाक्षरी करू नका
19 Jul 2025
सरकारने विधानसभेला पत्त्याचा क्लब बनवला
24 Jul 2025
आपल्याच बलस्थानाचा घात करु नका
20 Jul 2025
मेटा आणि गुगलला‘ईडी’चे समन्स
20 Jul 2025
इस्रायलने गाझातील युद्ध तातडीने थांबवावे
23 Jul 2025
पत्त्यांचा डाव टाकून कृषिमंत्र्यांचा निषेध
24 Jul 2025
जनसुरक्षा विधेयकावर स्वाक्षरी करू नका
19 Jul 2025
सरकारने विधानसभेला पत्त्याचा क्लब बनवला
24 Jul 2025
आपल्याच बलस्थानाचा घात करु नका
20 Jul 2025
मेटा आणि गुगलला‘ईडी’चे समन्स
20 Jul 2025
इस्रायलने गाझातील युद्ध तातडीने थांबवावे
23 Jul 2025
पत्त्यांचा डाव टाकून कृषिमंत्र्यांचा निषेध
24 Jul 2025
जनसुरक्षा विधेयकावर स्वाक्षरी करू नका
19 Jul 2025
सरकारने विधानसभेला पत्त्याचा क्लब बनवला
24 Jul 2025
आपल्याच बलस्थानाचा घात करु नका
20 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)