अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी सुरू   

पसंतीक्रम नोंदविण्यासाठी १३ जुलैपर्यंत मुदत

पुणे : इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील दुसरी नियमित फेरी जाहीर झाली आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना १० ते १३ जुलै दरम्यान महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदवून प्रवेश अर्ज लॉक करता येणार आहे. या फेरीतील गुणवत्ता आणि निवड यादी १७ जुलैला जाहीर होईल.
 
शिक्षण विभागातर्फे यंदा प्रथमच राज्यातील सर्व जिल्ह्यांत अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली. प्रवेशासाठी २१ लाख ३१ हजार ७२० जागा असून त्यातील केवळ ५ लाख ८ हजार ९६ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. अकरावी प्रवेशासाठी ९ हजार ४६६ महाविद्यालयांमधील जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. पहिल्या फेरीअंतर्गत अ‍ॅलॉट झालेल्या जागांवर प्रवेश घेण्यासाठी ७ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी कॅप राऊंडमधून केवळ ४ लाख ३२ हजार २८४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यामुळे अकरावी प्रवेशाच्या राज्यातील १५ लाख १५ हजार ६२८ जागा अजूनही रिक्त आहेत.
 
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने अकरावीच्या प्रवेशातील दुसरी फेरी जाहीर केली आहे. यानुसार, केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतील दुसर्‍या प्रवेश फेरीतील प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी नोंदणी आणि अर्जाचा भाग एकमध्ये दुरुस्ती करणे, विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत किमान एक ते कमाल १० उच्च माध्यमिक विद्यालयांचा समावेश करता येणार आहे. नियमित फेरी एकमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीत प्रवेश आणि पसंतीक्रम अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. तसेच याचवेळी कोट्याअंतर्गत प्रवेश प्रकिया सुरू असणार आहे.
 
दुसर्‍या नियमित फेरीचे वेळापत्रक
 
प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी नोंदणी व भाग १ मध्ये दुरुस्ती करणे. विद्यार्थी त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत किमान एक ते कमाल १० उच्च माध्यमिक विद्यालयांचा समावेश करू शकतात. नियमित फेरी एकमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीत प्रवेश व पसंतीक्रम अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध आहे. १० जुलै ते १३ जुलै विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळालेल्या महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करणे, प्रोसिड फॉर अ‍ॅडमिशनवर क्लिक करणे आणि आवश्यक कागदपत्रांसह संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे, विनंतीनुसार झालेले प्रवेश रद्द करता येतील. १८ ते २१ जुलै नियमित फेरी-२ साठी  ­Allotment पोर्टलवर जाहीर करणे, विद्यार्थी आणि महाविद्यालय लॉगिनमध्ये निवड यादी आणि तपशील दर्शविणे, विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे संदेश पाठविणे. दुसर्‍या फेरीचा कट ऑफ जाहीर करणे १७ जुलै रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे २३ जुलै

Related Articles