E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
खासदार बारणे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
Wrutuja pandharpure
15 Jun 2025
पिंपरी
:पिंपरी-चिंचवड शहरातील शेकडो युवा, महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. खासदार श्रीरंग बारणे यांनी शिवबंधन बांधून सर्वांचे पक्षात स्वागत केले. महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या.
थेरगाव येथील जनसंपर्क कार्यालयात झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यावेळी शिवसेना महिला नेत्या सुलभा उबाळे, युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव विश्वजीत बारणे, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, उपजिल्हा प्रमुख राजेश वाबळे, दिलीप पांढरकर, शहरप्रमुख निलेश तरस, पिंपरी-चिंचवड युवासेना जिल्हा प्रमुख राजेंद्र तरस, युवासेना जिल्हा प्रमुख सागर पाचरणे, पिंपरी-चिंचवड महिला संघटिका सरिता साने, युवतीसेना जिल्हा प्रमुख सायली साळवी, माजी नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, माजी नगरसेविका विमल जगताप, संतोष सौंदनकर, अंकुश कोळेकर, दिलीप कुसाळकर, कानिफनाथ तोडकर, प्रदीप दळवी, स्वरूपा खापेकर, शारदा वाघमोडे, कार्यकर्ते महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चिंचवड विधानसभा संघटक सुदर्शन देसले, शहर संघटिका शिला भोंडवे, रमेश विश्वकर्मा यांच्या प्रयत्नातून हा भव्य पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी सुरेश विश्वकर्मा, राजेश विश्वकर्मा, आदित्य यादव, भाविक गोडसे, अभिषेक गुप्ता, अंकुश यादव, प्रितीताई भुजबळ यांच्यासह शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत सामील झाले.राज्यभरात शिवसेनेत प्रवेश करणार्यांची संख्या मोठी आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित दररोज पक्ष प्रवेश होत आहेत. त्याचप्रमाणे पिंपरी-चिंचवड शहरातही मोठ्या संख्येने पक्षप्रवेश होत आहेत. मावळ लोकसभा मतदार संघांतील अनेक पक्षांचे कार्यकर्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना पक्षात प्रवेश करत आहेत.
युवा सेनेच्या माध्यमातून संघटना मजबूत
पिंपरी-चिंचवड शहरात युवासेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव विश्वजीत बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेने संघटना वाढीवर भर दिला आहे. युवा सेनेच्या माध्यमातून संघटना मजबूत होत आहे. विविध पक्षातील कार्यकर्ते पक्षात प्रवेश करीत आहेत. घरोघरी जाऊन संघटन वाढविले जात आहे. शिवसेनेच्या सभासद नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, पक्षात प्रवेश करणार्यांचा योग्य मानसन्मान राखला जाईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक पक्षाचे कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यामुळे संघटनेची ताकद वाढत आहे. नवे कार्यकर्ते आल्याने जुन्या, निष्ठावान, संघर्षाच्या काळात पक्षासोबत राहिलेल्या कार्यकर्त्यांवर कोणताही अन्याय होणार नाही. आगामी महापालिका निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढविली जाणार आहे. महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. त्याची वाट न पाहता शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी सर्वांनी झपाटून कामाला लागावे. या निवडणुकीत नवे, जुने, युवा कार्यकर्ते असा समतोल साधून उमेदवारी दिली जाईल.
Related
Articles
हत्याराने वार करणार्यास अटक
05 Jul 2025
मणिपूरमध्ये तीन दहशतवाद्यांना अटक
04 Jul 2025
अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीला महाराष्ट्र सरकारचा कायम विरोध
04 Jul 2025
महाराष्ट्राला उद्योगांचा मोठा वारसा
08 Jul 2025
आशियाई स्पर्धेत नेमबाजी संघात मनु भाकरचा समावेश
08 Jul 2025
परीक्षेत डमी उमेदवार; सात जणांवर गुन्हा
02 Jul 2025
हत्याराने वार करणार्यास अटक
05 Jul 2025
मणिपूरमध्ये तीन दहशतवाद्यांना अटक
04 Jul 2025
अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीला महाराष्ट्र सरकारचा कायम विरोध
04 Jul 2025
महाराष्ट्राला उद्योगांचा मोठा वारसा
08 Jul 2025
आशियाई स्पर्धेत नेमबाजी संघात मनु भाकरचा समावेश
08 Jul 2025
परीक्षेत डमी उमेदवार; सात जणांवर गुन्हा
02 Jul 2025
हत्याराने वार करणार्यास अटक
05 Jul 2025
मणिपूरमध्ये तीन दहशतवाद्यांना अटक
04 Jul 2025
अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीला महाराष्ट्र सरकारचा कायम विरोध
04 Jul 2025
महाराष्ट्राला उद्योगांचा मोठा वारसा
08 Jul 2025
आशियाई स्पर्धेत नेमबाजी संघात मनु भाकरचा समावेश
08 Jul 2025
परीक्षेत डमी उमेदवार; सात जणांवर गुन्हा
02 Jul 2025
हत्याराने वार करणार्यास अटक
05 Jul 2025
मणिपूरमध्ये तीन दहशतवाद्यांना अटक
04 Jul 2025
अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीला महाराष्ट्र सरकारचा कायम विरोध
04 Jul 2025
महाराष्ट्राला उद्योगांचा मोठा वारसा
08 Jul 2025
आशियाई स्पर्धेत नेमबाजी संघात मनु भाकरचा समावेश
08 Jul 2025
परीक्षेत डमी उमेदवार; सात जणांवर गुन्हा
02 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
3
थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण
4
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
5
जीएसटी संकलनात घट
6
रशियाच्या कारखान्यावर युक्रेनकडून ड्रोन हल्ला