आशियाई स्पर्धेत नेमबाजी संघात मनु भाकरचा समावेश   

नवी दिल्ली : ऑलिंपिकमध्ये दोन पदके जिंकणारी मनू भाकरचा १६ ते ३० ऑगस्ट दरम्यान कझाकस्तानमध्ये होणार्‍या १६ व्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणार आहे. सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या ३५ सदस्यीय  संघात मनु भाकर ही एकमेव नेमबाज आहे. दोन वैयक्तिक स्पर्धांमध्ये ती भाग घेणार आहे.
 
नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाने (एनआरएआय) जाहीर केलेले इतर संघ सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणार्‍या आयएसएसएफ ज्युनियर वर्ल्ड कप आणि ज्युनियर आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत खेळणार आहेत. एनआरएआयने चीनमधील निंगबो येथे होणार्‍या आयएसएसएफ वर्ल्ड कप (रायफल / पिस्तूल) साठी वरिष्ठ संघाचीही घोषणा केली आहे. ही स्पर्धा ७ ते १५ सप्टेंबर दरम्यान आयोजित केली जाईल. 
 
या प्रमुख आशियाई स्पर्धेसाठी वरिष्ठ संघात ३५ सदस्य आहेत. जे तीन मिश्र संघांसह १५ स्पर्धांमध्ये भाग घेतील. भाकर महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल आणि महिलांच्या २५ मीटर पिस्तूल स्पर्धांमध्ये भाग घेईल. वरिष्ठ संघात पुनरागमन करणार्‍या प्रमुख खेळाडूंमध्ये माजी पुरुष एअर रायफल विश्वविजेता रुद्राक्ष पाटील आणि ऑलिंपियन अंजुम मुदगिल (महिला ५० मीटर रायफल ३ पोझिशन्स), ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर (पुरुष ५० मीटर रायफल ३ पोझिशन्स), सौरभ चौधरी (पुरुष १० मीटर एअर पिस्तूल) आणि केनन चेनई (पुरुष ट्रॅप) यांचा समावेश आहे.
 
ईशा सिंग (२५ मीटर पिस्तूल), मेहुली घोष (एअर रायफल) आणि किरण अंकुश जाधव (एअर रायफल) हे दोघेही वरिष्ठ संघात आहेत. ऑलिंपिक कांस्यपदक विजेता स्वप्नील कुसाळे आणि माजी आशियाई क्रीडा विजेता आणि ऑलिंपियन राही सरनोबत यांना निंगबोला जाणार्‍या संघात स्थान मिळाले आहे. एनआरएआयने जाहीर केलेल्या दोन ३६ सदस्यीय ज्युनियर संघात ऑलिंपियन रायझा ढिल्लन हा एकमेव बदल आहे. मानसी रघुवंशीच्या जागी तिला दिल्ली विश्वचषक ज्युनियर महिला स्कीट संघात स्थान देण्यात आले आहे.

Related Articles