मणिपूरमध्ये तीन दहशतवाद्यांना अटक   

इंफाळ : मणिपूरच्या इंफाळ खोर्‍यातील जिल्ह्यांमध्ये सुरक्षा दलांनी वेगवेगळ्या संघटनांशी संबंधित तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे, असे पोलिसांनी गुरुवारी सांगितले. तसेच, शस्त्रे आणि दारुगोळा जप्त केला.
 
बिष्णुपूर जिल्ह्यातील मैत्रम भागातून बंदी घातलेल्या प्रेपाक (प्रो) संघटनेच्या एका सदस्याला बुधवारी पोलिसांनी अटक केली. ओइनम हेमनजीत सिंग असे त्याचे नाव आहे. सुरक्षा दलांनी इंफाळ पूर्व जिल्ह्यातील सेकमाइजिन मानिंग लेईकाई भागातून बंदी घातलेल्या कांगलीपाक कम्युनिस्ट पार्टी (पीडब्ल्यूजी) संघटनेशी संबंधित एका बंडखोराला अटक केली. ओइनम तोंबा सिंग (५७) असे त्याचे नाव आहे. 

Related Articles