हत्याराने वार करणार्‍यास अटक   

पुणे : हत्याराने तरूणाच्या डोक्यात वार करून फरार झालेल्या सराईत गुंडाला हडपसर पोलिसांनी अटक केली. विनीत रविंद्र इंगळे (वय २४, सातववाडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १ देशी कट्टा व १ जिवंत काडतुस जप्त केले. हडपसरमधील विशाल झोपडपट्टी येथील मिठाईचे दुकानाचे समोर २० मार्च रोजी रात्री पावणे अकरा वाजता हा प्रकार घडला होता.
 
आरोपी विनित इंगळे, रोहन गायकवाड व त्यांच्या दोन साथीदारांनी पूर्वीच्या भांडणाच्या रागातून दीपक विजय कलादगी (वय १९, पवार कॉलनी, हडपसर) याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. लोखंडी हत्याराने डोक्यात वार करुन त्याला गंभीर जखमी केले होते. तेव्हापासून विनीत इंगळे हा फरार होता. पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी व त्यांचे सहकारी गस्त घालत होते. त्यावेळी,  विनीत इंगळे हा लोहिया उद्यान येथे येणार असून त्याच्याकडे काहीतरी संशयित वस्तू असल्याची माहिती पोलीस अंमलदार महेश चव्हाण आणि अभिजित राऊत यांना खबर्‍याकडून मिळाली. त्यावरून, पोलिसांनी सापळा रचून इंगळे याला पकडले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे १ देशी कट्टा व १ जिवंत काडतुस आढळून आले. त्याच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

Related Articles