E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
आषाढीवारी पालखी सोहळा मार्गाची अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्याकडून पाहणी
Wrutuja pandharpure
14 Jun 2025
पिंपरी
: जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी १९ जून रोजी तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी २० जून रोजी पिंपरी चिंचवड शहरात येणार आहे. या सोहळ्याच्या स्वागतासाठी पिंपरी चिंचवड महापालिका सज्ज असून पालखी मार्गावर, मुक्कामाच्या ठिकाणी तसेच वारकर्यांना पुरविण्यात येणार्या सोयीसुविधांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिली.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळा स्वागत कक्ष आणि मुक्कामाच्या स्थळाची, तसेच पालखी मार्गाची पाहणी अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी केली. या पाहणी दौर्यावेळी सह शहर अभियंता बापू गायकवाड, देवन्ना गट्टूवार, आरोग्य विभागाचे उपायुक्त सचिन पवार, उद्यान विभागाचे सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी, कार्यकारी अभियंता, उपअभियंता आणि कर्मचारी उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी ‘पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी देण्यात येणार्या सेवा सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही, याची दक्षता संबंधित विभागांनी घ्यावी. सर्व विभागांनी समन्वयाने वारकर्यांना पुरविण्यात येणार्या सोयीसुविधांचे नियोजन करावे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. पावसाळ्याच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापनासाठी लागणारी यंत्रणा सज्ज ठेवावी. पिण्याचे पाणी, तातडीच्या वैद्यकीय सुविधा, वारकरी निवास आणि पालखी मार्गावर पुरेशा प्रमाणात फिरत्या शौचालयांची व्यवस्था करावी,’ असे निर्देश संबंधित अधिकार्यांना पाहणी दौर्यादरम्यान दिले.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यासाठी महापालिकेच्या वतीने निगडी येथील भक्ती शक्ती याठिकाणी स्वागतकक्ष उभारला जातो. येथे करण्यात येणार्या व्यवस्थेबद्दलची माहिती पाहणीदरम्यान अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी घेतली. पालखी मार्गावर पावसाचे पाणी कोठेही तुंबणार नाही, याचीही दक्षता घेण्याबाबत सूचनाही त्यांनी संबधित अधिकार्यांना दिल्या.
Related
Articles
कोयनेतील साठ्यात दररोज सरासरी २ ते ३ टीएमसीने वाढ
07 Jul 2025
आकाश दीपने उडविला डकेट, ओली पोप, रूट यांचा त्रिफळा
07 Jul 2025
नऊ जण अद्याप बेपत्ता
04 Jul 2025
कर्नाटकात पाच वाघांचा मृत्यू
07 Jul 2025
माजी सरन्यायाधीशांना बंगला सोडण्याची सूचना
07 Jul 2025
वैभव सूर्यंवशीने अर्धशतकी भागीदारी करत संघाला सावरले
02 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण
3
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
4
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
5
जीएसटी संकलनात घट
6
रशियाच्या कारखान्यावर युक्रेनकडून ड्रोन हल्ला