E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
कोयनेतील साठ्यात दररोज सरासरी २ ते ३ टीएमसीने वाढ
Samruddhi Dhayagude
07 Jul 2025
सातारा, (प्रतिनिधी) : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून धरणक्षेत्रातही दमदार हजेरी आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने वाढू लागलाय. शनिवारी प्रमुख ६ धरणांतील पाणीसाठा ९४ टीएमसीवर पोहोचला होता. तर कोयनेत दररोज सरासरी २ ते ३ टीएमसीने वाढ आहे. त्यामुळे कोयनेतील साठाही ६४ टीएमसी झाला. तर सध्या तीन धरणांतून सुमारे साडे सात हजार क्यूसेक विसर्ग सुरू झाला आहे.
जिल्ह्यात जून महिन्यात सरासरीच्या अधिक पर्जन्यमान झाले. यामुळे छोटे पाणी प्रकल्प भरुन वाहू लागले आहेत. तसेच ओढेही वाहत आहेत. पण, या पावसामुळे खरीप हंगामातील पेरण्यांवर मोठा परिणाम झालेला आहे. अशातच अजुनही पाऊस सुरूच आहे. विशेष करुन पश्चिम भागात पावसाचा जोर अधिक आहे. सातारा तालुक्याचा पश्चिम भाग, पाटण, जावळी आणि महाबळेश्वर तालुक्यात दमदार पाऊस होत आहे. त्याचबरोबर कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी या प्रमुख धरणक्षेत्रातही पाऊस आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढलाय. सध्या या सहा धरणातील साठा ९४ टीएमसीवर पोहोचला आहे.
सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ६४ मिलिमीटर पाऊस पडला. तर नवजा येथे ६८ आणि महाबळेश्वरला ५५ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. या पावसामुळे कोयना धरणात २८ हजार क्यूसेक पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा ६३.८८ टीएमसी झाला होता. ६०.६९ टक्के हा साठा आहे. त्यातच इतर प्रमुख धरणक्षेत्रातही पाऊस सुरूच आहे. धोम धरणातील पाणीसाठाही ९ टीएमसीवर गेला आहे. जवळपास ६७ टक्के साठा झाला आहे. कण्हेर धरण १०.१० टीएमसी क्षमतेचे आहे. सध्या या धरणात ७.३२ टीएमसी साठा झालाय. उरमोडी धरणातही ७.२४ टीएमसी म्हणजे ७३ टक्क्यांजवळ पाणीसाठा पोहोचलाय. सध्या कोयनासह धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी या धरणांत ९४ टीएमसीहून अधिक पाणीसाठा झालेला आहे. त्यामुळे ही धरणे भरण्यासाठी अजून ५४ टीएमसीची आवश्यकता आहे.
Related
Articles
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)
19 Jul 2025
इस्रायलने गाझातील युद्ध तातडीने थांबवावे
23 Jul 2025
कुसगाव ग्रामस्थांचे खंबाटकी बोगद्यात आंदोलन
21 Jul 2025
भूसंपादनाला संमती देणार्यास प्राधान्याने एरोसिटीत भूखंड वाटप होणार
19 Jul 2025
भोर तालुक्यातील भाटघर धरणाच्या पाण्याला अचानक चढला हिरवा रंग
22 Jul 2025
चांदीची चमक वाढली
24 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)