आकाश दीपने उडविला डकेट, ओली पोप, रूट यांचा त्रिफळा   

बर्मिंगहॅम : भारताने दुसर्‍या कसोटीत  जसप्रीत बुमराला विश्रांती देत आकाश दीपला संधी दिली होती. आकाश दीपने त्या संधीचे सोने केले आहे. त्याने महत्त्वपुर्ण 4 फलंदाज बाद केले. त्याने बेन डकेट, ओली पोप, ज्यो रूट यांचा त्रिफळा उडविला. तर हॅरी ब्रुक याला पायचित बाद केले. भारताचा कॅप्टन शुभमन गिल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर,  गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांनी दुसर्‍या कसोटीत जसप्रीत बुमराहला विश्रांती देत आकाश दीपला संधी दिली आहे. आकाश दीपने  या संधीचे सोने केले आहे.
 
आकाश दीपने दुसर्‍या कसोटीच्या पहिल्या डावात 4 बळी घेतल्या. तर, दुसर्‍या डावात देखील आतापर्यंत 4  बळी घेतल्या आहेत. आकाश दीप त्याच्या अफलातून गोलंदाजीच्या जोरावर एजबेस्टन कसोटीत हिरो बनला आहे.आकाश दीपने दुसर्‍या डावात बेन डकेट, ओली पोप,  जो रुट आणि हॅरी ब्रुक या चौघांना बाद केलं आहे. यापौकी बेन डकेट आणि जो रुट यांना चौथ्या दिवशी आकाश दीपनं बाद केलं होतं. तर, पाचव्या दिवशी ओली पोप आणि हॅरी ब्रुकला आकाश दीपनं बाद केलं आहे.
 
भारताने दोन्ही डावात आतापर्यंत मिळून 15 बळी घेतल्या आहेत. या सर्व विकेट महमद सिराज आणि आकाश दीपनं घेतल्या आहेत. आकाश दीपनं दोन्ही डावात मिळून आता 8 बळी घेतल्या आहेत. तर,  सिराजने 7 बळी घेतल्या आहेत.आकाश दीपने फेब्रुवारी 2024 मध्ये इंग्लंड विरुद्ध रांची कसोटीत पदार्पण केलं होतं. आकाश दीप त्याच्या करिअरमधील आठवी कसोटी खेळत आहे. आकाश दीपचं नेटवर्थ 8 ते 10 कोटी रुपये इतकं आहे. आकाश दीप बिहारच्या सासाराम मधील असून त्याचा जन्म 15 डिसेंबर 1996 रोजी झाला आहे.
 
रिषभ पंतनं इंग्लंडनं दुसर्‍या कसोटीच्या दुसर्‍या डावात दमदार फलंदाजी केली आहे. रिषभ पंतनं बर्मिंघमच्या एजबेस्टन मैदानावर इंग्लंड विरुद्ध 65 धावांची खेळी केली.  या खेळी दरम्यान त्यानं 58 बॉलमध्ये 65 धावा केल्या. त्यानं 8 चौकार आणि तीन षटकार मारले आहेत. रिषभ पंतचं हे कसोटीमधील 16 वं अर्धशतक आहे. रिषभ पंतनं आणखी एक विक्रम  केला आहे ज्यानं इंग्लंडच्या कॅप्टनला धक्का बसला आहे.रिषभ पंतचे विदेश दौर्‍यावर एखाद्या देशाविरुद्ध सर्वाधिक षटकार कसोटी क्रिकेटमध्ये मारण्याचा विक्रम केला आहे. रिषभ पंत याने इंग्लंडमध्ये 24 षटकार मारले आहेत. स्टोक्सनं दक्षिण आफ्रिकेत त्यांच्या विरुद्ध 21 षटकार मारले आहेत. रिषभ पंतनं आजच्या खेळीत 3 षटकार मारले. रिषभ पंतनं आज हा विक्रम आपल्या नावावर केला

Related Articles