नऊ जण अद्याप बेपत्ता   

सिगाची कारखाना दुर्घटना

संगारेड्डी, (तेलंगणा) : तेलंगणातील सिगाची औषधी निर्मिती कारखान्यातील भीषण स्फोटातील बळींची संख्या ४० वर पोहोचली आहे. तर, अद्याप नऊ जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे जिल्हा पोलिस अधीक्षक परितोष पंकज यांनी गुरुवारी सांगितले.
 
दरम्यान, स्फोटाची कारणे शोधण्यासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेली समिती घटनास्थळास भेट देणार आहे. या समितीला एक महिन्यात सूचना आणि शिफारशींसह सविस्तर अहवाल सादर करावा लागणार आहे. या समितीचे अध्यक्ष ‘सीएसआयआर’चे डॉ. बी. वेंकटेश्वर राव आहेत. आतापर्यंत ९० टक्के ढिगारा हटविण्यात आला आहे. काही मानवी अवशेष बाहेर हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 
 

Related Articles