माजी सरन्यायाधीशांना बंगला सोडण्याची सूचना   

नवी दिल्ली : माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना सरकारी बंगला सोडण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाने केली आहे. तसेच या संदर्भात केंद्राला एक पत्र लिहिले आहे. त्यात चंद्रचूड यांना तातडीने बंगला सोडण्यास सांगावे, असे म्हटले आहे.
 
कृष्णा मेनन मार्गावर चंद्रचूड राहात असलेला बंगला क्रमांक पाच आहे. निवृत्तीनंतर तो मुदतीनंतरही सोडलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाने या संदर्भात गृहनिर्माण आणि शहर व्यवहार मंत्रालयाला १ जुलै रोजी पत्र लिहिले आहे. त्यात बंगला चंद्रचूड यांनी तातडीने मोकळा करण्याची गरज व्यक्त केली आहे. खरे तर त्यांनी ३१ मे २०२५ रोजी बंगला सोडायला हवा होता. २०२२ मधील नियमानुसार १० मे २०२५ रोजी सहा महिन्यांची अतिरिक्त मुदत संपली आहे, असे पत्रात नमूद केले. चंद्रचूड यांनी ५० वे सरन्यायाधीश म्हणून नोव्हेंबर २०२२ आणि नोव्हेंबर २०२४ दरम्यान काम पाहिले होते. निवृत्तीनंतर आठ महिने उलटल्यानंतर ते सरकारी बंगल्यात राहात आहेत. चंद्रचूड यांच्यानंतर निवृत्त झालेले संजीव खन्ना यांनी देखील बंगला सोडलेला नाही. विद्यमान सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी पूवी दिलेल्या बंगल्यात राहात आहेत.  दरम्यान, चंद्रचूड यांनी गेल्या वर्षी१८ डिसेंबर रोजी तत्कालिन सरन्यायाधीश खन्ना यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. तेव्हा जेथे राहात आहे तेथेच आणख काही दिवस राहू द्यावे, अशी विनंती केली होती. कारण निवृत्तीनंतर त्यांना तुघलक रस्ता येथे दिलेला बंगला क्रमांक १४ चे फेरनिर्माण सुरू आहे. ती खन्ना यांनी मान्य केली होती. मुदतीनंतर पुन्हा राहू देण्याची विनंती केली. त्याची मुदत ३१ मे पर्यत होती. त्यासाठी महिना ५ हजार रुपये परवाना शुल्क देण्यास सांगितले होेते.
 

Related Articles