वैभव सूर्यंवशीने अर्धशतकी भागीदारी करत संघाला सावरले   

नॉर्थहॅम्प्टन : इंग्लंड दौर्‍यावर भारतीय अंडर १९ संघाचे नेतृत्व करणार्‍या आयुष म्हात्रेवर दुसर्‍या वनडे सामन्यात ’गोल्डन डक’ची नामुष्की ओढावली आहे. यूथ वनडे स्पर्धेतील भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील १९ वर्षाखालील संघात खेळवण्यात येत असणारा सामना नॉर्थहॅम्प्टनच्या काउंटी क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात येत आहे. इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर आयुष म्हात्रेने वैभव सूर्यंवशीच्या साथीने युवा टीम इंडियाच्या डावाची सुरुवात केली. पण त्याला आपली छाप सोडता आली नाही. 
 
भारतीय संघाच्या डावातील पहिल्या षटकातील पहिल्याच चेंडूवर फ्रेंच याच्या गोलंदाजीवर आयुष म्हात्रेत बोल्ड झाला. कर्णधार स्वस्तात माघारी फिरल्यावर नॉन स्ट्राइक एन्डला असलेल्या १४ वर्षी वैभव सूर्यंवशीने विहान मल्होत्राच्या साथीने अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला.पण अर्धशतकाच्या जवळ पोहत्यावर त्यानेही आपला बळी दिला. विहानसोबत दुसर्‍या बळीसाठी ६९ धावांची भागीदारी करणार्‍या वैभव सूर्यंवशीने ३४ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४५ धावांची खेळी केली. युवा भारताकडून विहान मल्होत्रा याने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली. 
 
त्याच्याशिवाय राहुल कुमार ४७ (४७),  किनिष्क चौहान ४५ (४०) यांनी उपयुक्त धावा केल्या. पण एकालाही अर्धशतक साजरे करता आले नाही. एवढेच नाहीत तर भारतीय संघ ४९ व्या षटकातच ऑल आउट झाला. त्यामुळे ३०० पारचं गणितही चुकलं.४९ षटकात सर्वबाद २९० धावा करत युवा टीम इंडियाने इंग्लंडच्या संघासमोर २९१ धावांचे आव्हान सेट केले आहे. इंग्लंडच्या संघाला रोखतं सलग दुसरा विजय मिळवण्यासाठी युवा टीम इंडिया प्रयत्नशील असेल.

Related Articles