कर्नाटकात पाच वाघांचा मृत्यू   

दोन अधिकारी निलंबित  

बंगळुरू : माले महाडेश्वर हिल्समधील पाच वाघांच्या अनैसर्गिक मृत्यू प्रकरणी निष्काळजीपणा आणि कर्तव्यात कसूर केल्याबद्दल कर्नाटकचे वनमंत्री ईश्वर खांद्रे यांनी दोन अधिकार्‍यांना निलंबित केले. 
 
२६ जून रोजी एमएम हिल्सच्या हुग्याम रेंजमध्ये एक वाघीण आणि तिचे चार बछडे मृतावस्थेत आढळले होते. वाघांच्या अनैसर्गिक मृत्यूमध्ये अधिकार्‍यांनी निष्काळजीपणा आणि कर्तव्यात कसूर केल्याचे स्पष्ट पुरावे असल्याने सहाय्यक वनसंरक्षक गजानन हेगडे, वनाधिकारी मधेश आणि उपवनसंरक्षक वाय चक्रपाणी या तिघांना अटक करण्यात आली आहे. हेगडे आणि मधेश या दोघांना निलंबित करण्यात आले असून, चक्रपाणी यांनाही निलंबित करण्याची शिफारस वनमंत्र्यांनी कार्मिक आणि प्रशासकीय सुधारणा विभागाला केली आहे. 
 
या प्रकरणाच्या तपासासाठी अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक कुमार पुष्कर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या समितीला १० जुलैपर्यंत अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश खांद्रे यांनी दिले आहेत.

Related Articles