E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
अतिरिक्त सैन्याने लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता
Samruddhi Dhayagude
11 Jun 2025
लॉस एंजेलिस : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार, ७०० मरीन कॉर्प्स आणि दोन हजार अतिरिक्त नॅशनल गार्ड सैनिक लॉस एंजेलिसला रवाना झाले आहेत, त्यामुळे तेथील परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे.स्थानिक अधिकारी आणि गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी ट्रम्प यांच्या या निर्णयाला विरोध केला आहे. ते म्हणाले, की यामुळे निदर्शनांना तोंड देणे अधिक कठीण होईल. ट्रम्प यांनी यापूर्वी लॉस एंजेलिसमध्ये सैन्य तैनात करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार दोन हजार सैन्य येथे पोहोचण्यास सुरुवात झाली. ६ जूनपासून लॉस एंजेलिसमध्ये निदर्शने सुरू झाली आहेत. त्या दिवशी फेडरल इमिग्रेशन अधिकार्यांनी शहरातील ४० हून अधिक नागरिकांना अटक केली.
९ जून रोजी झालेल्या निदर्शनादरम्यान फारसा गोंधळ झाला नाही. सिटी हॉलमध्ये शांततापूर्ण फेरीत हजारो नागरिक सहभागी झाले आणि शेकडो नागरिकांनी फेडरल कॉम्प्लेक्सबाहेर निदर्शने केली. या कॉम्प्लेक्समध्ये एक डिटेंशन सेंटर देखील आहे, येथे शहरभर छापे टाकल्यानंतर काही स्थलांतरितांना ठेवण्यात आले आहे.
ट्रम्प यांचे बेजबाबदार पाऊल
महापौर करेन बास आणि न्यूसम म्हणाले, लॉस एंजेलिसमधील परिस्थितीचे ट्रम्प यांनी केलेले वर्णन सत्यापासून खूप दूर आहे. पोलिसांनी मदतीची आवश्यकता नसल्याचे सांगितले असतानाही ट्रम्प यांनी सैन्याला तैनात करून सार्वजनिक सुरक्षिततेला धोका निर्माण केला असल्याचे त्यांनी सांगितले. ट्रम्प यांचे हे पाऊल बेजबाबदार आणि सैन्याचा अनादर करणारे आहे.ही कारवाई सार्वजनिक सुरक्षेसाठी करण्यात आली नव्हती. एका अध्यक्षाच्या अहंकाराला समाधानी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे, अशी टीका न्यूसम यांनी केली.
अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे मुख्यालय असलेल्या पेंटागॉनने सोमवारी लॉस एंजेलिसमध्ये सुमारे ७०० मरीन कॉर्प्स सैनिक तैनात केले. जेणेकरून नॅशनल गार्डच्या सैनिकांना इमिग्रेशन कारवाईविरुद्धच्या निदर्शनांना तोंड देण्यास मदत होईल, असे अधिकार्यांनी सांगितले.
ट्रम्प यांच्याविरोधात खटला दाखल
कॅलिफोर्नियाने ’गार्ड’ सैन्य तैनात केल्याबद्दल ट्रम्प यांच्याविरुद्ध खटला दाखल केला आहे. येथे चौथ्या दिवशीही निषेध सुरूच आहे. अमेरिकेच्या नॉर्दर्न कमांडने एका निवेदनात म्हटले आहे, की दक्षिण कॅलिफोर्नियाच्या वाळवंटातील ट्वेंटीनाइन पाम्स बेसवरील मरीन फोर्सेस संघीय मालमत्ता आणि कर्मचार्यांचे, ज्यात संघीय इमिग्रेशन एजंट्सचा समावेश आहे, संरक्षण करण्यासाठी तैनात केले जात आहेत. लॉस एंजेलिसचे पोलिस प्रमुख जिम मॅकडोनेल यांनी सोमवारी दुपारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की मोठ्या निदर्शनांना हाताळण्याच्या पोलिस विभागाच्या क्षमतेवर त्यांना पूर्ण विश्वास आहे. पोलिस विभागाशी समन्वय न ठेवता मरीन फोर्सेसच्या आगमनामुळे मोठे लॉजिस्टिक आणि ऑपरेशनल आव्हाने निर्माण झाली आहेत.
Related
Articles
आसाममध्ये तीन ठिकाणी पूरस्थिती गंभीर
08 Jul 2025
सिद्धरामय्यांची खुर्ची टिकली (अग्रलेख)
05 Jul 2025
पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील बॉम्ब बनवण्यासाठी ई-कॉमर्स साईटवरून खरेदी
09 Jul 2025
शुभमन गिलचे पुन्हा शतक
06 Jul 2025
विट्स हॉटेलच्या निविदा प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करणार
08 Jul 2025
मणिपूरमध्ये तीन दहशतवाद्यांना अटक
04 Jul 2025
आसाममध्ये तीन ठिकाणी पूरस्थिती गंभीर
08 Jul 2025
सिद्धरामय्यांची खुर्ची टिकली (अग्रलेख)
05 Jul 2025
पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील बॉम्ब बनवण्यासाठी ई-कॉमर्स साईटवरून खरेदी
09 Jul 2025
शुभमन गिलचे पुन्हा शतक
06 Jul 2025
विट्स हॉटेलच्या निविदा प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करणार
08 Jul 2025
मणिपूरमध्ये तीन दहशतवाद्यांना अटक
04 Jul 2025
आसाममध्ये तीन ठिकाणी पूरस्थिती गंभीर
08 Jul 2025
सिद्धरामय्यांची खुर्ची टिकली (अग्रलेख)
05 Jul 2025
पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील बॉम्ब बनवण्यासाठी ई-कॉमर्स साईटवरून खरेदी
09 Jul 2025
शुभमन गिलचे पुन्हा शतक
06 Jul 2025
विट्स हॉटेलच्या निविदा प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करणार
08 Jul 2025
मणिपूरमध्ये तीन दहशतवाद्यांना अटक
04 Jul 2025
आसाममध्ये तीन ठिकाणी पूरस्थिती गंभीर
08 Jul 2025
सिद्धरामय्यांची खुर्ची टिकली (अग्रलेख)
05 Jul 2025
पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील बॉम्ब बनवण्यासाठी ई-कॉमर्स साईटवरून खरेदी
09 Jul 2025
शुभमन गिलचे पुन्हा शतक
06 Jul 2025
विट्स हॉटेलच्या निविदा प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करणार
08 Jul 2025
मणिपूरमध्ये तीन दहशतवाद्यांना अटक
04 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
3
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
4
यादी सुधारण्याची घाई (अग्रलेख)
5
सिद्धरामय्यांची खुर्ची टिकली (अग्रलेख)
6
कोलकाता अत्याचार प्रकरण