शुभमन गिलचे पुन्हा शतक   

बर्मिंगहॅम : भारत-इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टनच्या मैदानात सुरु आहे. चौथ्या दिवसामध्ये भारतीय संघाने दुसर्‍या डावाला सुरुवात केली. भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल याने पुन्हा शतक साकारले. त्याने १३४ चेंडूत ११२ धावा केल्या. त्याच्या आधी सलामीवीर जैस्वाल २८ धावांवर तर के.एल.राहुल हा ५५ धावांवर बाद झाले. राहुल याने शानदार अर्धशतक केले. करूण नायर याने २६ धावा केल्या. पंत ६५ धावांवर बाद झाला. रवींद्र जडेजा ३२ धावांवर खेळत आहे. 
 
भारतीय संघ इंग्लंडचा पहिला डाव ४०७ धावांवर आटोपत आपल्या दुसर्‍या डावाची सुरुवात केली आहे. तिसर्‍या दिवसाअखेर भारतीय संघाने यशस्वी जैस्वालच्या रुपात एक बळी गमावली. पण ६४ धावांसह टीम इंडियानं २६४ धावांची आघाडी घेतली आहे. केएल राहुल आणि करुण नायर ही जोडी मैदानात खेळत होती. चौथ्या दिवसाच्या खेळात भारतीय संघ इंग्लंडसमोर चारशे पेक्षा अधिक धावांचे टार्गेट सेट करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. 
 
भारतीय संघ पहिल्या डावात ५८७ धावांवर आटोपल्यावर इंग्लंडच्या संघाच्या पहिल्या डावाची सुरुवात खराब झाली. तिसर्‍या दिवसाच्या खेळातील पहिल्याच सत्रात ८४ धावांवर अर्धा संघ तंबूत परतला. भारतीय संघाने सामन्यावर मजबूत पकड मिळवलीये असे वाटत असताना जेमी स्मिथ अन् हॅरी ब्रूक जोडी जमली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ३०३ धावांची भागीदारी रचत इंग्लंडचा डाव सावरला. 
 
याआधी हॅरी-ब्रूक अन् जो रूट जोडीनं पाच विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली होती. जेमी स्मिथ १८४ (२०७)*  शेवटपर्यंत नाबाद राहिला. पण हॅरी ब्रूकची १५८ (२३४) विकेट मिळवल्यावर टीम इंडियाने इंग्लंडला ऑल आउट करायला खूप वेळ घेतला नाही. सिराजनं तळाच्या फलंदाजीला सुरुंग लावत ६ विकेट्स आपल्या खात्यात जमा करत इंग्लंडच्या मैदानातील आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना यजमान संघाला पहिल्या डावात ४०७ धावांवर रोखलं.
 
इंग्लंडच्या संघाला पहिल्या डावात ४०७ धावांवर रोखत भारतीय संघाने दुसर्‍या कसोटी सामन्यात १८० धावांची आघाडी घेतली. केएल राहुल आणि यशस्वी जैयस्वालनं दुसर्‍या डावात संघाला दमदार सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी पूर्ण झाल्यावर सलामीवीर यशस्वीच्या रुपात टीम इंडियाला पहिला धक्का बसला. तो २२ चेंडूत २८ धावा करून तंबूत पतला. ५१ धावांवर भारतीय संघाने ही विकेट गमावली. त्यानंतर त्यानंतर लोकेश राहुल २८ (३८) आणि करुण नायर ७ (१८) यांनी इंग्लंडला विकेट्सची संधी न देता तिसर्‍या दिवसाअखेर भारतीय संघाच्या धावफलकावर १ विकेटच्या मोबदल्यात ६४ धावा लावल्या.  

Related Articles