पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील बॉम्ब बनवण्यासाठी ई-कॉमर्स साईटवरून खरेदी   

FATFच्या अहवालात धक्कादायक खुलासा

नवी दिल्ली : पुलवामा येथे २०१९ मध्ये आणि गोरखनाथ मंदिरात एप्रिल २०२२ मध्ये रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये ऑनलाईन पेमेंट सर्व्हिसेस, व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (VPN) आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा वापर झाल्याची माहिती समोर आली आहे. फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स (FATF)ने मंगळवारी यासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध केला. तसेच या अहवालात म्हटले आहे की, सोशल मिडिया, मेसेजिंग ऍप आणि क्राउडफंडिंग साइट्स यासारख्या बऱ्याच डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा मोठ्या प्रमाणात दहशतवादाला पैसा पुरवण्यासाठी गैरवापर केला जात आहे.
 
FATF च्या अहवालात कोणत्याही देशाचा उल्लेख करण्यात आलेला नाही, तरी यामध्ये नमूद केले आहे की दहशतवादासाठी वित्तपुरवठ्यासाठी ‘स्टेट स्पॉन्सरशिप’चा वापर एकतर पैसा उभारण्याचे तंत्र म्हणून किंवा दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या विशिष्ट संघटनांच्या आर्थिक व्यवस्थापन धोरणाचा भाग म्हणून केल्याबद्दल त्यांच्या डेलिगेशनकडून अहवाल मिळाले आहेत. सार्वजनिकरित्या उपलब्ध माहितीचे स्त्रोत आणि डेलिगेशनने रिपोर्टमध्ये दिलेल्या इनपुट्सनुसार असे सूचित होते की, काही ठराविक दहशतवादी संघटनांना गेल्या काही काळापासून आर्थिक आणि इतर माध्यमातून बऱ्याच देशांच्या सरकारांकडून पाठिंबा मिळला आणि तो आताही मिळणे सुरू आहे.
 
“अनेक प्रकारचा पाठिंबा दिल्याचे नोंदवण्यात आले आहे. ज्यामध्ये थेट आर्थिक पाठिंबा, लॉजिस्टिक आणि मटेरियल सपोर्ट, किंवा प्रशिक्षण पुरवणे याचा समावेश आहे. डेलिगेशनने नोंदवले की, दहशतवादी वित्त पुरवठ्यासाठी स्टेट स्पॉन्सरशिप ही सँग्शन्स सर्क्युंव्हेशन टेकनिक्स (sanctions circumvention techniques)च्या माध्यमातून व्यापर आणि तस्करी यंत्रणांशी जोडण्यात आली, ज्यामध्ये राष्ट्रीय सरकारने कथितपणे सहाय्यक भूमिका बजावली, असे ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह अपडेट ऑन टेररिस्ट फायनान्शियल रिस्क्स (Comprehensive Update on Terrorist Financing Risks’, या अहवालामध्ये म्हटले आहे.
 
यासाठी बऱ्याच प्रकारच्या मालाची विक्री झाल्याचा देखील माहिती यामध्ये दिली आहे. जसे की, एका मध्यस्थ देशात सोन्याच्या बदल्यात विकण्यासाठी जहाजाने तेल पाठवण्यात आले, नंतर हे सोने दुसर्‍याच अधिकारक्षेत्रात पैशांत हस्तांतरण करण्यात आले, असे अहवालामध्ये म्हटले आहे.
 
यापूर्वी जून महिन्यात जारी केलेल्या निवेदनात, एफएटीएफने २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला होता. तसेच असे हल्ले पैसे आणि दहशतवाद्यांच्या समर्थकांकडून निधीची देवाणघेवाण झाल्याशिवाय होणे शक्य नाही असेही म्हटले होते. तेव्हाच त्यांनी त्यांच्या जागतिक नेटवर्कद्वारे अशी प्रकरणे एकत्रित करत दहशतवादाला होणार्‍या वित्त पुरवठ्याचे विश्लेषण करण्याची योजना असल्याचे म्हटले होते.

Related Articles