E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
अक्कलकोटजवळ अपघातात दोन भाविक ठार; आठ जखमी
Samruddhi Dhayagude
11 Jun 2025
सोलापूर, (प्रतिनिधी) : सोलापूर - अक्कलकोट महामार्गावर कर्जाळ (ता. अक्कलकोट) येथील पुलावर थांबलेल्या मालमोटारीला भाविकांच्या एका खासगी बसने धडक दिली. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर, आठ जण गंभीर जखमी झाले असून इतर काहींना किरकोळ जखम झाली आहे.
गौरीशंकर कुलकर्णी (वय-५१ वर्षे, पुणे) व आकाश मुकेश जाधव (वय-३२, पुणे) अशी मृत भाविकांची नावे आहेत.तर शेखर सिद्धाराम जाधव (वय-३१), संगीता मुकेश जाधव (वय-५५) वृंंदा अरुण उंडाळे (वय-६३), सुनीता शेलके (वय-४५), मीना अरुण दरेकर, ज्योतिबा गावंडे, शकुंतला ओनवणे, बस चालक महेश पवार (सर्व रा. पुणे ) हे गंभीर जखमी झाले. जखमींवर अक्कलकोट ग्रामीण रूग्णालय, अश्विनी रूग्णालय कुंभारी तसेच शासकीय रूग्णालय, सोलापूर येथे उपचार चालू आहेत. खासगी बसमध्ये एकूण ३० प्रवाशी होते.
पुणे येथील आर्या ट्रॅव्हलच्या बस चालकाने मालमोटारीला डाव्या बाजूने जोरात धडक दिली. अपघाताचे वृत समजताच पोलिस निरीक्षक महेश स्वामी, उत्तर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तात्काळ ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी पाठविले. मृतदेह काढण्यासाठी माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे व मनसेचे तालुकाध्यक्ष मल्लिनाथ पाटील यांनी ग्रामस्थांसह पोलिसांना मदत केली. टोइंग व्हॅनच्या मदतीने अपघातग्रस्त खासगी बस बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली. अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे.
Related
Articles
रवींद्र जडेजाचे २३ वे अर्धशतक
04 Jul 2025
चेंगराचेंगरीस आरसीबी जबाबदार
02 Jul 2025
बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देणार्या डॉक्टरांवर कारवाई
08 Jul 2025
शस्त्रास्त्र व्यापारी भंडारी फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित
06 Jul 2025
प्रयागराजमध्ये हिंसाचार; ५० जणांना अटक
02 Jul 2025
केरळमध्ये निपाहने डोके वर काढले
05 Jul 2025
रवींद्र जडेजाचे २३ वे अर्धशतक
04 Jul 2025
चेंगराचेंगरीस आरसीबी जबाबदार
02 Jul 2025
बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देणार्या डॉक्टरांवर कारवाई
08 Jul 2025
शस्त्रास्त्र व्यापारी भंडारी फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित
06 Jul 2025
प्रयागराजमध्ये हिंसाचार; ५० जणांना अटक
02 Jul 2025
केरळमध्ये निपाहने डोके वर काढले
05 Jul 2025
रवींद्र जडेजाचे २३ वे अर्धशतक
04 Jul 2025
चेंगराचेंगरीस आरसीबी जबाबदार
02 Jul 2025
बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देणार्या डॉक्टरांवर कारवाई
08 Jul 2025
शस्त्रास्त्र व्यापारी भंडारी फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित
06 Jul 2025
प्रयागराजमध्ये हिंसाचार; ५० जणांना अटक
02 Jul 2025
केरळमध्ये निपाहने डोके वर काढले
05 Jul 2025
रवींद्र जडेजाचे २३ वे अर्धशतक
04 Jul 2025
चेंगराचेंगरीस आरसीबी जबाबदार
02 Jul 2025
बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देणार्या डॉक्टरांवर कारवाई
08 Jul 2025
शस्त्रास्त्र व्यापारी भंडारी फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित
06 Jul 2025
प्रयागराजमध्ये हिंसाचार; ५० जणांना अटक
02 Jul 2025
केरळमध्ये निपाहने डोके वर काढले
05 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण
3
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
4
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
5
जीएसटी संकलनात घट
6
रशियाच्या कारखान्यावर युक्रेनकडून ड्रोन हल्ला