E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
रवींद्र जडेजाचे २३ वे अर्धशतक
Samruddhi Dhayagude
04 Jul 2025
बर्मिंगहॅम : भारत-इंग्लंड यांच्यातील बर्मिंगहॅमच्या ’लढाई’त नंबर वन ऑलराउंडर रवींद्र जडेजाने आपल्या फलंदाजीतील धमक दाखवत इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात ’तलवारबाजी’चा शो दाखवला. शुबमन गिलसोबत सहाव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील २३ वे अर्धशतक झळकावले.
अर्धशतक किंवा शतक केल्यावर जडेजा बॅट हवेत फिरवत ’तलवारबाजी’चा नजराणा पेश करत आनंद व्यक्त करतानाना अनेकदा पाहायला मिळते. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या बॅटिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात येत होते. अखेर महत्त्वपूर्ण सामन्यात टीम इंडियासाठी दमदार खेळी करत त्याने ट्रोलर्सची बोलती बंद करणारी खेळी साकारलीये.
बर्मिंगहॅमच्या मैदानात इंग्लंडचा तगडा रेकॉर्ड आहे. दुसरीकडे या मैदानात भारतीय संघ एकही सामना जिंकलेला नाही. रवींद्र जडेजासाठी हे मैदान खूपच खास आहे. कारण आपल्या कसोटी कारकिर्दीतील परदेशातील पहिले कसोटी शतक जडेजानं याच मैदानात ठोकले होते. २०२२ मध्ये जडेजानं या मैदानात १९४ चेंडूत १०४ धावांची खेळी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्याला या मैदानात शतकी खेळी करण्याची संधी आहे.
बर्मिंगहॅमच्या मैदानात भारतीय संघाकडून सर्वोच्च भागीदारी करणार्या जोड्यांमध्ये जडेजाचे नाव दोन वेळा दिसते. २०२२ च्या दौर्यात रिषभ पंतसोबत त्याने या मैदानात २२२ धावांची भागीदारी रचली होती. ही बर्मिंगहॅमच्या मैदानातील भारतीय संघाकडून करण्यात आलेली सर्वोच्च भागीदारी आहे.
शुबमन गिलसोबत जड्डूनं १५० + भागीदारीसह या मैदानातील दुसर्या क्रमांकाची भागीदारी रचली. गावसकर आणि चौहान जोडीनं १९७९ च्या दोर्यात या मैदानात १२४ धावांची भागीदारी रचल्याचा रेकॉर्ड आहे. बर्मिंगहॅमच्या मैदानात दोन सर्वोच्च भागीदारीमध्ये वाटा उचलणारा जड्डू हा पहिला भारतीय बॅटर ठरला.
Related
Articles
पुतीन यांना भेटण्यास झेलेन्स्की तयार
23 Jul 2025
सूरज चव्हाण यांची युवक राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी
22 Jul 2025
’बहुरूपी भारूड’मधून उलगडली मराठी संस्कृती
20 Jul 2025
वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डने बोलावली आपत्कालीन बैठक
23 Jul 2025
तीन दिवस रंगणार ‘शि. द. १०० महोत्सव’
24 Jul 2025
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
20 Jul 2025
पुतीन यांना भेटण्यास झेलेन्स्की तयार
23 Jul 2025
सूरज चव्हाण यांची युवक राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी
22 Jul 2025
’बहुरूपी भारूड’मधून उलगडली मराठी संस्कृती
20 Jul 2025
वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डने बोलावली आपत्कालीन बैठक
23 Jul 2025
तीन दिवस रंगणार ‘शि. द. १०० महोत्सव’
24 Jul 2025
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
20 Jul 2025
पुतीन यांना भेटण्यास झेलेन्स्की तयार
23 Jul 2025
सूरज चव्हाण यांची युवक राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी
22 Jul 2025
’बहुरूपी भारूड’मधून उलगडली मराठी संस्कृती
20 Jul 2025
वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डने बोलावली आपत्कालीन बैठक
23 Jul 2025
तीन दिवस रंगणार ‘शि. द. १०० महोत्सव’
24 Jul 2025
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
20 Jul 2025
पुतीन यांना भेटण्यास झेलेन्स्की तयार
23 Jul 2025
सूरज चव्हाण यांची युवक राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी
22 Jul 2025
’बहुरूपी भारूड’मधून उलगडली मराठी संस्कृती
20 Jul 2025
वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डने बोलावली आपत्कालीन बैठक
23 Jul 2025
तीन दिवस रंगणार ‘शि. द. १०० महोत्सव’
24 Jul 2025
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
20 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)