केरळमध्ये निपाहने डोके वर काढले   

तीन जिल्ह्यांत दोन संशयास्पद रुग्ण

तिरुवनंतपुरम : केरळच्या तीन जिल्ह्यांत निपाह विषाणूचा संसर्गाचे दोन संशयित रुग्ण सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे विषाणू राज्यात पुन्हा धुमाकूळ घालेल की काय? अशी भीती पसरली आहे.  
 
कोझिकोडे, मल्लापुरम आणि पल्लकड जिल्ह्यात आरोग्याची दक्षता नागरिकांनी घ्यावी, असा इशारा देण्यात आला असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. कोझिकोडे आणि मल्ल्लापुूरम वैद्यकीय महाविद्यालयात चाचणी केली असता संशयित प्रामुख्याने मल्लापूरम आणि पलक्कड जिल्ह्यातील असल्याचे उघड झाले. त्यांना आजार झाला आहे की नाही, हे तपासणीसाठी नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू तपासणी संस्थेकडे पाठवण्यात आले आहेत.
 
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री विणा जॉर्ज यांनी सांगितले की, प्रतिबंधात्मक उपाय योजण्यासाठी मार्गदर्शक सूचना काढण्यासाठी पावले उचलली आहेत. तिन्ही जिल्ह्यांत २६ विशेष पथके स्थापन केली आहेत. त्या माध्यमातून निपाहची लक्षणे आढळणार्‍या नागरिकांची पाहणी केली जात आहे. तसेच परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची ओळख पटविण्यासाठी पोलिसांची मदत घेतली जात आहे. संसर्गजन्य विभाग आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्यास जिल्हाधिकार्‍यांना सांगितले आहे. राज्य आणि स्थानिक हेल्पलाइन सेवा सुरू केली जात आहे. गेल्या आठवड्यात अनैसर्गिक किंवा अचानक मृत्यूच्या घटनांचा मागोवा घेण्यास अधिकार्‍यांना बजावले आहे. त्या माध्यमातून मोठा संसर्ग टाळता येईल, असा होरा आहे. लवकरच उच्चस्तरीय बैठक घेतली जाणार असून परिस्थितीवर नियंत्रण मिळविणे आणि प्रतिबंधात्मक उपायांवर चर्चा केली जाणार आहे. 
 

Related Articles