प्रयागराज : प्रयागराजच्या करचना तालुक्यातील इसोटा गावात जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेकीच्या घटनांनंतर पोलिसांनी २० हून अधिक जणांना अटक केली. त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.आझाद समाज पक्षाचे प्रमुख व खासदार चंद्रशेखर आझाद हे एका दलित तरुणाच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जात होते. त्यांना इसोटा गावात प्रवेश करण्यापासून पोलिसांनी रोखले होते. चंद्रशेखर यांना ताब्यात घेतले आणि सर्किट हाऊसमध्ये पाठवले.. यानंतर समर्थकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. दंगलखोरांनी पोलिसांच्या तीन वाहनांसह सुमारे डझनभर वाहनांची तोडफोड केली आणि अनेक दुचाकी जाळल्या. दगडफेकीत अनेक पोलिस आणि चौकी प्रमुखांसह नागरिक जखमी झाले आहेत. घटनास्थळावरून सुमारे ४२ दुचाकी जप्त केल्या. आता वाहन क्रमांकांच्या आधारे मालकांची ओळख पटवली जात आहे. संबंधितांना नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावले जाणार आहे. दरम्यान, चंद्रशेखर आझाद यांनी स्पष्ट केले आहे की, गोंधळ घालणारे पक्षाचे कार्यकर्ते नव्हते. ही संपूर्ण घटना एखाद्या मोठ्या कटाचा भाग असू शकते.
Fans
Followers