चेंगराचेंगरीस आरसीबी जबाबदार   

बंगळुरू : एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेरील चेंगराचेंगरीस रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) जबाबदार असल्याचा निष्कर्ष केंद्रीय प्रशासकीय लवादाने काढला आहे. यासोबतच, आयपीएस अधिकारी विकास कुमार यांच्याविरुद्ध कर्नाटक सरकारचा निलंबनाचा आदेशदेखील रद्द केला आहे. या आदेशाविरुद्ध अपील करण्याची संधी आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली.
 
आयपीएल विजेत्या आरसीबीचा ४ जून रोजी चिन्नास्वामी स्टेडियममध्ये विजयोत्सव होता. त्यावेळी चेंगराचेंगरीत ११ जणांना प्राण गमवावे लागले होते. तर, ५० हून अधिक जण जखमी झाले होते. या प्रकरणात बंगळुरु पोलिसांनी आरसीबी, कार्यक्रम व्यवस्थापन संस्था, डीएनए एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि कर्नाटक क्रिकेट असोसिएशनविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तसेच, हे प्रकरण चौकशीसाठी गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग केले होते.

Related Articles