E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
चार हजार कोटींच्या ठेवी असताना पालिका मोशी रुग्णालयासाठी घेणार ५५० कोटींचे कर्ज
Samruddhi Dhayagude
11 Jun 2025
कर्ज घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने बॉण्डद्वारे शहरातील विकासकामांसाठी ४०० कोटींचे कर्ज घेतले आहे. आता मोशी येथील रुग्णालयासाठी ५५० कोटींचे कर्ज महापालिका घेणार आहे. त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. महापालिकेच्या तब्बल ४ हजार कोटींच्या ठेवी असताना कर्ज घेऊन विकासकामे करण्याचा निर्णय शंका निर्माण करणारा आहे.
शहरात पवना, मुळा आणि इंद्रायणीनदी सुधार प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यावर तब्बल तीन हजार कोटींपेक्षा अधिकचा खर्च करण्यात येणार आहे. त्या प्रकल्पासाठी महापालिकेने २०२३ मध्ये म्युन्सिपल बॉण्ड काढून २०० कोटींचे कर्ज काढले आहे. त्या रकमेतून मुळा नदी सुधार प्रकल्पाचे पहिल्या टप्प्यातील काम सुरू आहे. प्राधिकरण, निगडीत सुरू असलेल्या हरितसेतू प्रकल्पासाठी तसेच टेल्को रस्त्यावर अर्बन स्ट्रीट डिजाईननुसार काम करण्यासाठी २०० कोटींचे ग्रीन बॉण्ड काढून कर्ज काढण्यात आले आहे. असे एकूण ४०० कोटी रुपयांचे कर्ज महापालिकेने काढले आहे.
महापालिकेच्या वतीने मोशी येथील १५ एकर जागेत ८ मजली ८५० बेडचे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय बांधण्यात येत आहे. त्याचे काम सुरू केले आहे. त्यासाठी एकूण ७५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. ती इमारत पर्यावरणपूरक व हरित संकल्पनेवर आधारित आहे. तसेच दापोडी ते निगडी मार्गाच्या दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रस्त्यावर अर्बन स्ट्रीट डिजाईनचे काम केले जात आहे. त्यासाठी १७० कोटी खर्च अपेक्षित आहे.या दोन्ही कामांसाठी महापालिका ५५० कोटींचे कर्ज काढत आहे. त्याची नोटीस महापालिकेने डिसेंबर २०२३ ला प्रसिद्ध केली होती. त्यानंतर विरोधकांनी महापालिकेवर टीका करीत कर्ज घेऊन महापालिकेस कर्जबाजारी करू नका.
प्रशासकीय राजवटीत कर्ज घेण्याचा मोठा निर्णय घेण्यात येऊ नये, अशी मागणी केली होती. त्याची दखल घेऊन प्रशासनाने ५५० कोटी कर्ज घेण्याचा निर्णय फिरविल्याची चर्चा महापालिका वर्तुळात होती. या बँक कर्जाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. हे कर्ज केंद्र शासन मान्यताप्राप्त राष्ट्रीयीकृत बँकेकडून घेण्यात येत आहे. लवकरच कर्जाची रक्कम महापालिकेस प्राप्त होईल, असे महापालिकेच्या अधिकार्यांनी सांगितले.
कर्ज अत्यावश्यक कामांसाठी नाही
महापालिकेच्या तब्बल ४ हजार कोटींच्या ठेवी असताना असे कर्ज काढण्याची गरज काय?, असा प्रश्न शहरवासीयांकडून उपस्थित केला जात आहे. पुणे महापालिकेने पाणीपुरवठा योजनेसाठी २०० कोटींचे म्युन्सिपल बॉण्डद्वारे कर्ज उभे केले. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिका अत्यावश्यक कामांसाठी कर्ज न काढता अर्बन स्ट्रीट डिजाईन, हरित सेतू, नदी सुधार प्रकल्प आदींसाठी कर्ज काढत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. श्रीमंत समजल्या जाणार्या महापालिकेस कर्जाच्या खाईत लोटण्याचे काम सुरू असल्याचा आरोप केला जात आहे.
कर्जावरील व्याजाच्या रकमेचा भुर्दंड
म्युन्सिपल बॉण्डद्वारे २०० कोटी आणि ग्रीन बॉण्डद्वारे २०० कोटींचे महापालिकेने कर्ज घेतले आहे. दोनशे कोटींच्या ग्रीन बॉण्डसाठी वर्षाला १५ कोटींप्रमाणे पाच वर्षांसाठी ७५ कोटी व्याज भरावे लागणार आहे. केंद्राकडून महापालिकेस २० कोटींचे प्रोत्साहनपर अनुदान मिळत असले तरी, ५५ कोटी अतिरिक्त भुर्दंड महापालिकेवर पडणार आहे. २०० कोटी म्युन्सिपल बॉण्डसाठीवरील व्याजाची रक्कम मोठी आहे. ५५० कोटींच्या बँक कर्जावरही व्याजापोटी महापालिकेवर कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड पडणार आहे.
नाशिक फाटा उड्डाण पुलासाठी कर्ज
महापालिकेने कासारवाडीतील नाशिक फाटा चौकात दुमजली उड्डाणपूल उभारला आहे. त्यासाठी जागतिक बँकेकडून १५९ कोटी ११ लाखांचे कर्ज जानेवारी २०१५ मध्ये घेण्यात आले होते. ते कर्ज अद्याप महापालिका फेडत आहे. त्याची मुदत जानेवारी २०२३९ पर्यंत आहे.
Related
Articles
बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देणार्या डॉक्टरांवर कारवाई
08 Jul 2025
शेअर सर्टिफिकेट धारकांसाठी खुशखबर
07 Jul 2025
गर्दीच्या काळातही प्रवाशांना मिळणार रेल्वे तिकीट
03 Jul 2025
न्यू साउथ वेल्सच्या किनार्यावरील वादळ तीव्र होणार?
02 Jul 2025
हिमाचल प्रदेशात पावसाचे ४३ बळी; ३७ बेपत्ता
05 Jul 2025
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण
02 Jul 2025
बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देणार्या डॉक्टरांवर कारवाई
08 Jul 2025
शेअर सर्टिफिकेट धारकांसाठी खुशखबर
07 Jul 2025
गर्दीच्या काळातही प्रवाशांना मिळणार रेल्वे तिकीट
03 Jul 2025
न्यू साउथ वेल्सच्या किनार्यावरील वादळ तीव्र होणार?
02 Jul 2025
हिमाचल प्रदेशात पावसाचे ४३ बळी; ३७ बेपत्ता
05 Jul 2025
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण
02 Jul 2025
बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देणार्या डॉक्टरांवर कारवाई
08 Jul 2025
शेअर सर्टिफिकेट धारकांसाठी खुशखबर
07 Jul 2025
गर्दीच्या काळातही प्रवाशांना मिळणार रेल्वे तिकीट
03 Jul 2025
न्यू साउथ वेल्सच्या किनार्यावरील वादळ तीव्र होणार?
02 Jul 2025
हिमाचल प्रदेशात पावसाचे ४३ बळी; ३७ बेपत्ता
05 Jul 2025
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण
02 Jul 2025
बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देणार्या डॉक्टरांवर कारवाई
08 Jul 2025
शेअर सर्टिफिकेट धारकांसाठी खुशखबर
07 Jul 2025
गर्दीच्या काळातही प्रवाशांना मिळणार रेल्वे तिकीट
03 Jul 2025
न्यू साउथ वेल्सच्या किनार्यावरील वादळ तीव्र होणार?
02 Jul 2025
हिमाचल प्रदेशात पावसाचे ४३ बळी; ३७ बेपत्ता
05 Jul 2025
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण
02 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण
3
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
4
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
5
जीएसटी संकलनात घट
6
रशियाच्या कारखान्यावर युक्रेनकडून ड्रोन हल्ला