भाजप प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण   

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. पक्षाचे केंद्रीय निरीक्षक किरण रिजीजू यांनी याबाबतची घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आदी वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. 
 
विधानसभा निवडणुकीनंतर चव्हाण यांच्याकडे प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. अपेक्षेप्रमाणे प्रदेशाध्यक्ष पदासाठी चव्हाण यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे, त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा बाकी होती. चव्हाण यांनी काल जाहीर कार्यक्रमात बावनकुळे यांच्याकडून सूत्रे स्वकारली. मंत्री चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार आदी नेते यावेळी उपस्थित होते.

Related Articles