E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
पहिल्या फेरीची अंतिम गुणवत्ता यादी आज होणार जाहीर
Samruddhi Dhayagude
11 Jun 2025
अकरावी प्रवेश प्रक्रिया
पुणे : अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या सुधारित वेळापत्रकानुसार नियमित पहिल्या फेरीची अंतिम गुणवत्तायादी आज (बुधवारी) जाहीर होईल. १२ ते १४ जून दरम्यान शून्य फेरीतील प्रवेश, तर २७ जून ते ३ जुलै या कालावधीत पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने दिली. प्रवेश प्रक्रियेत एकूण १२ लाख ७१ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. त्यानंतर पहिल्या फेरीची तात्पुरती गुणवत्तायादी जाहीर करून त्यावर हरकती, सूचना मागवण्यात आल्या होत्या. आज बुधवारी अंतिम गुणवत्तायादी प्रसिद्ध होण्यासह शून्य फेरीअंतर्गत व्यवस्थापन कोटा, अल्पसंख्याक कोटा, संस्थांतर्गत कोट्यातील विद्यार्थ्यांना प्रवेशाचे वाटप केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना १२ ते १४ जून या कालावधीत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन शुल्क भरून, कागदपत्रे पडताळणी करून प्रवेश निश्चित करता येणार आहे. त्यानंतर १७ जूनला केंद्रिभूत प्रवेशांतर्गत गुणवत्तायादीच्या आधारे विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे वाटप केले जाणार आहे. २६ जूनला प्रवेश फेरीसाठी विद्यार्थी महाविद्यालय वाटप यादी जाहीर केली जाणार आहे. तसेच फेरीनिहाय पात्रता गुण संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील, तर २७ जून ते ३ जुलै या कालावधीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाऊन कागदपत्रे पडताळणी करून, शुल्क भरून प्रवेश निश्चित करता येणार आहे. नियमित पहिल्या फेरीत पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळूनही संबंधित विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेतल्यास त्यांना प्रतिबंधित करण्यात येईल. संबंधित विद्यार्थ्यांना सर्वांसाठी खुला प्रवेश या फेरीमध्येच प्रवेशाची संधी मिळणार आहे. ५ जुलै रोजी दुसर्या फेरीसाठीच्या रिक्त जागांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
Related
Articles
आंबोडीमधील पुलाला पहिल्याच पावसात गळती
05 Jul 2025
आम्ही दोघे एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी
06 Jul 2025
हिंदी भाषा सक्तीचा आदेश रेशिमबागेतून आला
08 Jul 2025
अल्पवयीन मुलांकडून तरुणावर कात्रीने वार
06 Jul 2025
माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार यांची बिनविरोध निवड
06 Jul 2025
महाराष्ट्राला उद्योगांचा मोठा वारसा
08 Jul 2025
आंबोडीमधील पुलाला पहिल्याच पावसात गळती
05 Jul 2025
आम्ही दोघे एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी
06 Jul 2025
हिंदी भाषा सक्तीचा आदेश रेशिमबागेतून आला
08 Jul 2025
अल्पवयीन मुलांकडून तरुणावर कात्रीने वार
06 Jul 2025
माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार यांची बिनविरोध निवड
06 Jul 2025
महाराष्ट्राला उद्योगांचा मोठा वारसा
08 Jul 2025
आंबोडीमधील पुलाला पहिल्याच पावसात गळती
05 Jul 2025
आम्ही दोघे एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी
06 Jul 2025
हिंदी भाषा सक्तीचा आदेश रेशिमबागेतून आला
08 Jul 2025
अल्पवयीन मुलांकडून तरुणावर कात्रीने वार
06 Jul 2025
माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार यांची बिनविरोध निवड
06 Jul 2025
महाराष्ट्राला उद्योगांचा मोठा वारसा
08 Jul 2025
आंबोडीमधील पुलाला पहिल्याच पावसात गळती
05 Jul 2025
आम्ही दोघे एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी
06 Jul 2025
हिंदी भाषा सक्तीचा आदेश रेशिमबागेतून आला
08 Jul 2025
अल्पवयीन मुलांकडून तरुणावर कात्रीने वार
06 Jul 2025
माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार यांची बिनविरोध निवड
06 Jul 2025
महाराष्ट्राला उद्योगांचा मोठा वारसा
08 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
3
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
4
एक देश, एक भाषा सूत्राचे अपयश
5
यादी सुधारण्याची घाई (अग्रलेख)
6
सिद्धरामय्यांची खुर्ची टिकली (अग्रलेख)