हिंदी भाषा सक्तीचा आदेश रेशिमबागेतून आला   

सपकाळ यांचा आरोप

मुंबई, (प्रतिनिधी) : हिंदी, हिंदुत्व व हिंदू राष्ट्र ही ज्यांची संकल्पना आहे तेच पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याच्या पाठीमागे आहेत. या मानसिकतेचे लोकच बहुजनांच्या ज्ञानाची मराठी भाषा व तिचा संघर्ष गिळू पाहात आहेत. हा जुनाच संघर्ष असून हिंदीच्या निमित्ताने तो पुन्हा चव्हाट्यावर आणला आहे. हिंदी सक्तीच्या फतव्यामागे रेशिमबाग असल्याने त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न फडणवीस सरकार करत आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
 
शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीने हिंदी सक्ती विरोधात सोमवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले. या आंदोलनात सपकाळ सहभागी झाले होते. 
सरकारने डॉ. नरेंद्र जाधव समिती नेमलेली आहे. जाधव हे रबर स्टॅम्प असून ते भाषा तज्ज्ञ नाहीत. सरकारला जे हवे तेच ते जाधव यांच्याकडून करून घेतील. त्यामुळे गाफील राहून चालणार नाही, असा इशारा सपकाळ यांनी दिला. आपला लढा दोन आदेश रद्द करण्यापुरता नाही तर महाराष्ट्र धर्म वाचवण्याचा असून आगामी काळात एक कृती आराखडा तयार करून जिल्ह्या-जिल्ह्यात जाऊन जागृती करावी लागेल. 
 

Related Articles