अल्पवयीन मुलांकडून तरुणावर कात्रीने वार   

पिंपरी : मस्करीमध्ये सुरू असलेल्या मारहाणीचा जाब विचारल्याच्या रागातून एका अल्पवयीन मुलाने तरुणाच्या गळ्यावर कात्रीने वार केले. ही घटना गुरुवारी रात्री वाकड येथील एकता कॉलनीमध्ये घडली. याप्रकरणी विष्णू विठ्ठल गायकवाड (वय २१, रा. डांगे चौक) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी व त्यांचा मित्र रामचंद्र हे जेवण करून खोलीवर येत होते. यावेळी त्यांच्या ओळखीचा प्रीतम व त्याचा मित्र आरोपी अल्पवयीन मुलगा हे दोघे समोरून आले. यावेळी आरोपीने मस्करीत फिर्यादी यांच्या गालावर चपट्या मरल्या. फिर्यादी यांचा मित्र रामचंद्र याने मस्करीमध्ये आरोपीस तू चापटा का मारतोस असे विचारणा केली. याचा राग येऊन आरोपी हा शेजारी असलेल्या मेन्स पार्लरमध्ये गेला व तिथून त्याने कात्री आणली. त्याने रामचंद्र याला तुला मारून टाकीन अशी धमकी देत फिर्यादीच्या मित्राच्या गळ्यावर कात्रीने दोन वार करत ठार मारण्याचा प्रयत्न केला. 

Related Articles